pravin darekar sakal media
मुंबई

'नवाब मलिक यांच्या डोक्यावर परिणाम झालाय'

'समीर वानखेडे मुस्लिम आहेत, हा अट्टसाह कशासाठी?'

वैदेही काणेकर

मुंबई: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांचे ड्रग्स पेडलरसोबत (Drug peddlar) संबंध असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (Ncp) आणि प्रवक्ते नवाब मलिक (Nawab malik) यांनी केला आहे. या आरोपावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उत्तर दिलं आहे. "नवाब मलिक यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याचं दिसतयं. रोज सकाळी उठल्यावर कुठलातरी फोटो शोधायचा. त्या आधारे टि्वट करुन, सनसनाटी निर्माण करण्याच त्यांचं काम सुरु आहे" असे प्रवीण दरेकर म्हणाले.

"मंत्री म्हणून शपथ घेताना संविधानाची चौकट असते, काही अटी असतात, त्याचा भंग नवाब मलिक करत आहेत" असे प्रवीण दरेकर म्हणाले. "व्यक्तीगत आरोप, जीतवरुन बोलणं हा भंग आहे. अशा प्रकारे गोपनीयतेचा भंग करणं, जातीवाचक बोलणं या सगळ्याचा विचार करुन, नवाब मलिकांचा राजीनामा मागतिला पाहिजे" असे दरेकर म्हणाले.

"समीर वानखेडे मुस्लिम आहेत, हा अट्टहास कशासाठी? कोण कुठल्या जातीत जन्माला येतो, याचा अट्टहास कशासाठी, नवाब मलिक यांनी शपथेचा भंग केलाय, त्यामुळे त्यांचा राजीनामा घ्या" अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! सततच्या पावसामुळे नुकसान झाले तरच शेतकऱ्यांना मिळणार भरपाई; सततचा पाऊस म्हणजे काय?, सोलापुरातील ‘या’ ३ तालुक्यातच अतिवृष्टी झाल्याची नोंद

दैव की कर्म?

आजचे राशिभविष्य - 24 ऑगस्ट 2025

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 24 ऑगस्ट 2025

टेबल टेनिसमध्ये भारताला ऑलिंपिक पदकाची आशा

SCROLL FOR NEXT