मुंबई

Pravin Darekar: Pravin Darekar: अडचणीतील नागरी सहकारी बँकांसाठी २०० कोटींची तरतूद करावी

दरेकर यांची सभागृहात मागणी ; पतसंस्थांचीही अशीच अवस्था असून सहकार मंत्र्यांनी अर्बन बँकांच्या धर्तीवर पतसंस्थांसाठी समिती नेमून त्यांनाही उर्जीतावस्थेत आणावे

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: अडचणीत असलेल्या राज्यातील नागरी सहकारी बँकांसाठी शासनाने २०० कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी आज सभागृहात केली.

राज्यातील नागरी सहकारी बँकांच्या अडचणींबाबत राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने अहवाल सादर केला आहे. साधारणता २०० कोटी रुपये शासनाने उपलब्ध करून दिले तर राज्यातील ५५० पैकी २०० ते २५० अडचणीत असलेल्या नागरी बँका बाहेर येऊ शकतील. अन्यथा ५० टक्के नागरी बँका वर्षभरात बंद पडतील, असेही दरेकर यांनी पुरवणी मागण्यांवर सांगितले. त्याचबरोबर पतसंस्थांचीही अशीच अवस्था असून सहकार मंत्र्यांनी अर्बन बँकांच्या धर्तीवर पतसंस्थांसाठी समिती नेमून त्यांनाही उर्जीतावस्थेत आणावे, असेही ते म्हणाले.

ग्लोबल टेंडर च्या नावाखाली मुंबई महापालिकेमधील पंचाहत्तर हजार स्वच्छता कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड पडेल. त्यामुळे हे ग्लोबल टेंडर रद्द करावे अशी मागणीही दरेकर यांनी केली. ४०० कोटींची उलाढाल असलेल्या एकाच माणसाला हे काम देऊन त्याला गब्बर करण्याचे कारण काय ? असेही त्यांनी विचारले.

कोकणासंदर्भात दरेकर यांनी पुढील मागण्या केल्या

  • राज्यात पाच ठिकाणी क्लस्टर उद्योग येत आहेत. त्यांना महाडच्या एमआयडीसीमध्ये जागा उपलब्ध करून द्यावी.

  • वन जमिनीवर नागरिकांना पाणी, वीज, स्वच्छतागृहे उपलब्ध करून द्यावीत.

  • माणगाव येथील नागावच्या पुरातन बालाजाई मंदिराला पर्यटनाच्या माध्यमातून तीर्थस्थळाचा दर्जा देऊन निधी उपलब्ध करून द्यावा.

  • पोलादपूर तालुक्यात अनेक बंधारे भूमिपूजन होऊनही अर्धवट अवस्थेत असून ते लवकरात लवकर पूर्ण करावेत.

  • क्रीडामंत्र्यांनीही मंजुरी दिल्यामुळे पोलादपूरला 'तालुका क्रीडा' भवन उभारण्याची कार्यवाही सुरू करावी. त्यासाठी लवकरात लवकर जागा शोधावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

kolhapur kagal politics: मुश्रीफ -राजे गट एकत्र आल्यानंतर, मंडलिकांनी वेगळी चाल खेळली; संजय घाटगेंची भेट घेत केली बंद खोलीत चर्चा

Viral Video: देवीच्या जत्रेत छाया कदमची कोकणात हजेरी, साधेपणाचं झालं कौतूक, गावाकडचं प्रेम जपणारी अभिनेत्री

Latest Marathi News Update LIVE : अंबरनाथ नगरपालिकेच्या माहितीफलकावर गोंधळ! झाडू चिन्हाचा पक्षनावाविना उल्लेख

Nitish Kumar Takes Oath as Bihar Chief Minister : नितीशकुमार दहाव्यांदा झाले बिहारचे मुख्यमंत्री; पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत घेतली शपथ!

Kolhapur Politics : मुश्रीफांची सून बिनविरोध झाल्यानंतर मंडलिक अॅक्शनमोडवर सगळ्या उमेदवारांना केलं गायब, कागलचं राजकारण वेगळ्या वळणावर

SCROLL FOR NEXT