Nawab malik  File photo
मुंबई

अतुल भातखळकरांनी नवाब मलिकांविरोधात पोलिसात नोंदवली तक्रार

का नोंदवली तक्रार?

दीनानाथ परब

मुंबई: रेमडेसिव्हीर इंजेक्शनवरून केंद्र सरकारविरोधात अफवा आणि खोटी माहिती पसरवून लोकांमध्ये भीती निर्माण केल्याबद्दल राज्याच्या अल्पसंख्यांक खात्याचे मंत्री नबाब मलिक यांच्याविरुद्ध भाजप नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. याप्रकरणी अफवा पसरविल्याबद्दल मलिक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवावा, अशी मागणीही भातखळकर यांनी दिंडोशी पोलिस ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीत केली आहे. मलिक यांचे हे वक्तव्य राष्ट्रीय एकतेला छेद देणारे व केंद्र-राज्य यांच्यात वाद निर्माण करणारे आहे, असेही भातखळकर यांचे म्हणणे आहे.

रेमडेसिव्हीर उत्पादक कंपन्यांनी महाराष्ट्राला रेमडेसिव्हीर इंजेक्शन देऊ नये, अन्यथा अशा कंपन्यांचा परवाना रद्द करू, अशी धमकी केंद्र सरकारने दिल्याचा खोटा आरोप मलिक यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता. याद्वारे त्यांनी केंद्र व राज्य सरकारमध्ये नाहक वाद निर्माण केलाच, पण राष्ट्रीय एकतेला तडा जाईल, असे हे वक्तव्य असल्याचा आरोपही भातखळकर यांनी केला आहे. ही अफवा आणि खोटी वक्तव्ये लोकांमध्ये समाजमाध्यमांच्या साह्याने पसरवून लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचे काम केले.

यामुळे हजारो लोक भयभीत होऊन आपल्या मूळगावी परत जाण्यास निघाले. त्यामुळे रेल्वेस्थानके, बसस्थानके येथे मोठी गर्दी होऊन कोरोनाचा फैलाव झाला असल्याची शक्यता आहे, असे भातखळकर यांनी म्हटले आहे. मलिक यांचे हे कृत्य पूर्णपणे बेकायदेशीर असून साथरोग अधिनियम 1897 नुसार गुन्हा असल्यामुळे नवाब यांच्यावर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणीही भातखळकर यांनी आपल्या तक्रारीत केली आहे. राज्य सरकारने पुढील 48 तासांत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल न केल्यास याप्रकरणी उच्च न्यायालयात जाणार असल्याचा इशारा सुद्धा भातखळकर यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI News: RBI सरकारला देणार तब्बल 2.87 लाख कोटी! कारण काय? बँकिंग,शेअर बाजार आणि अर्थव्यवस्थेवर काय परिणाम?

IPL 2026 Playoff Scenarios: सनरायझर्स हैदराबादविरुद्ध Eliminator सामना कोण खेळणार? एका जागेसाठी ४ संघात टक्कर; पाहा समीकरण

Pune Metro Leak : पुणे मेट्रोत गळती! कोट्यवधींच्या प्रकल्पाच्या सुरक्षेवर मोठा सवाल; VIDEO पाहून पुणेकर हादरले

Marathi Live News update: अमरावती जिल्ह्यात 24 वर्षीय युवकाचा 11 केव्ही लाईन चा शॉक लागून मृत्यू

Cockroach Janta Party चे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक! तुमचं इन्स्टाग्राम हॅक होऊ नये यासाठी आजच बदला 'या' 3 सेटिंग

SCROLL FOR NEXT