BMC-Office 
मुंबई

BMC लसीसाठी अजून कटोरा घेऊन फिरते आहे - अतुल भातखळकर

सगळं टक्केवारीच साटेलोटे आहे.

दीनानाथ परब

मुंबई: 'द ललित' (The lalit hotel) या प्रसिद्ध हॉटेल मध्ये लसीकरण होत असल्याच समजल्यानंतर काल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai mayor kishori pednekar) यांनी अचानक या ठिकाणी धडक दिली. 23 तारखेपासून दिवसाला 500 जणांना लस (vaccine doses) दिल्याचं समोर आलंय. गंभीर बाब म्हणजे या लसी घरच्या सारख्या साध्या फ्रीज मध्ये स्टोर करण्यात आल्यात ज्यावर महापौरांनी आक्षेप घेतलाय. (Bjp mla atul bhatkhalkar slam mayor kishori pednekar over Mumbai vaccination at five star hotels)

महापौरांच्या या धडक कारवाईवर भाजपाचे कांदिवलीचे आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे. "पंचतारांकित हॉटेलात लसीकरणाबाबत केंद्र सरकारने संताप व्यक्त केल्यावर महापौरांना जाग आलेली दिसतेय. सगळं टक्केवारीच साटेलोटे आहे. केंद्राची नजर वळली म्हणून धाडीची नौटंकी. पंचतारांकित हॉटेल्सनाही लसी मिळतायत, @mybmc अजून कटोरा घेऊन फिरते आहे" अशी टीका भातखळकर यांनी केली आहे.

"सुश्रुत आणि क्रीटीकेअर 2 हॉस्पिटलने ललित सोबत करार केला. यामध्ये ही परवानगी केंद्राकडून आहे मात्र याची माहिती महापालिकेला दिलीच नाही जे गंभीर आहे. कोल्ड स्टोरेज मेंटेन केलं गेलं नाही यावर माझा आक्षेप आहे. यावर दोन्ही हॉस्पिटलला जाब विचारणार आहे" असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

"लस देण्यासाठी ज्या sop असतात त्याचं उल्लंघन याठिकाणी झालं. महापालिकेला इथे लसीकरण होत असल्याचं कळवायला हवं होतं. चौकशी करून पुढे निर्णय घेऊ" असे महापौर म्हणाल्या. मुंबईत हॉटेलमध्ये, खासगी हॉस्पिटल्समध्ये होणाऱ्या लसीकरणावर आता टीका सुरु झालीय. २५० आणि ४०० रुपयांच्या लसींचे डोस १ हजार, १४०० रुपयांना दिले जातायत, त्यावर काँग्रेस नेत्यांनी टीका सुरु केलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT