bjp mla ganpat gaikwad says kalyan bhiwandi lok sabha election bjp dominance politics Sakal
मुंबई

Kalyan Loksabha Election : कल्याण लोकसभेवर पुन्हा भाजपचा दावा? भाजप आमदाराचा गौप्यस्फोट

राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड मधील निवडणुकीत भाजपला घवघवीत यश

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड मधील निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्यामुळे कल्याण पूर्वेत भाजपकडून जल्लोष करत विजय उत्सव साजरा केला गेला. दरम्यान भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पुन्हा एकदा एक गौप्यस्फोट केला आहे.

कल्याण आणि भिवंडी लोकसभेवर भाजपचे उमेदवार विजयी होतील असे त्यांनी या जल्लोषात म्हटले आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ असून यावर पुन्हा भाजपने दावा केल्याचे दिसून येत आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघ हा शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा मतरदार संघ आहे. शिवसेनेचा हा बालेकिल्ला असून हा मतदारसंघ भाजपकडे यावा यासाठी भाजप जोरदार प्रयत्न करत आहे.

तर हा मतदारसंघ हातातून जाऊ नये यासाठी खासदार डॉ. शिंदे हे जोर लावत आहेत. राज्यात सत्तेत भाजप व शिंदे हे मित्रपक्ष असले तरी पण स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षातील अंतर्गत वाद हे चव्हाट्यावर येत आहेत.

मानपाडा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची बदली वरून हा वाद चर्चेला आला. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, आमदार गणपत गायकवाड यांनी यावेळी शिंदे गटाच्या विरोधात परखड भूमिका मांडली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा वाद शांत केला असला तरी अध्ये मध्ये वादाची ठिणगी ही पडताना दिसतेय. भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यातील वाद तर काही केल्या कमी होत नाही. त्यातच आमदार गायकवाड हे विकास कामावरून शिंदे गटाला कानपिचक्या घेण्याची एक पण संधी सोडत नाही.

त्यातच आमदार गायकवाड यांनी पुन्हा एकदा गौप्यस्फोट केला आहे. तीन राज्यांत भाजप आघाडीवर असून कल्याण पूर्वेत जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी भाजप आमदार गणपत गायकवाड म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नागरिकांचा विश्वास आहे.

यामुळे या तिन्ही राज्यांत भाजप आघाडीवर आहे. मध्यप्रदेश मध्ये सुध्दा बहुमताने भाजप आलेले आहे. त्यामुळे हा जल्लोष आम्ही करत आहोत. येणाऱ्या काळात याठिकाणी राज्याच्या निवडणूका असतील किंवा केंद्राच्या निवडणुका असतील यासर्व ठिकाणी भाजप आघाडीवर असेल. तसेच कल्याण लोकसभा आणि भिवंडी लोकसभेत जे आमच्या भाजपचे उमेदवार उभे असतील ते निवडून येतील असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: कोल्ड्रिफ सिरप (Batch No. SR-13) चा तात्काळ वापर थांबविण्याचे एफडीएचे आदेश

Hampi Tourism: फक्त 2 दिवसात हंपी एक्सप्लोर करायचंय? ही ठिकाणं नक्की पाहा!

INDW vs PAKW: ४,४,४ प्रतिकाने केलेली सुरुवात अन् मग ऋचाच्या आक्रमणाने केला शेवट; भारताचे पाकिस्तानसमोर मोठे लक्ष्य

Jayakumar Gore: रामराजेंचं प्रेम करायचं वय निघून गेलंय: पालकमंत्री जयकुमार गोरे; रणजितसिंहांकडे मैत्रीचा हात पुढे केला अन्..

अब मजा आयेगा ना भिडू! प्रियाचे खरे आई-वडील अखेर सापडलेच; खोटी तन्वी प्रतिमाला त्रास देताना रविराज स्वतः पाहणार, आजच्या भागात काय घडणार?

SCROLL FOR NEXT