Devendra Fadnavis  Sakal
मुंबई

देवेंद्र फडणवीस पुन्हा मुंबईत जाहीर सभा घेणार; तारीखही ठरली

14 मे रोजी शिवसेनेकडून मुंबईत सभेचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये उद्धव ठाकरे बोलणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : नुकतीच भाजपने मुंबईमध्ये 1 मे रोजी बूस्टर सभा घेतली होती. त्यानंतर आता पुन्हा भाजपातर्फे दुसऱ्या जाहीर सेभेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. येत्या 15 मे रोजी राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे गोरेगाव येथे जाहीर सभा घेणार असून, यावेळी ते कुणावर तोफ डागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, गेल्या काही दिवासांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये आरोपप्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झाडल्या जात आहेत. त्यात आता पुन्हा भाजपने त्यांच्या दुसऱ्या सभेची तारीख जाहीर केली आहे. त्यात फडणवीस नेमकं काय बोलणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये यासभेचे आयोजन करण्यात आल्याचे भाजपकडून (BJP) सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे 14 मे रोजी शिवसेनेकडून (Shivsena) मुंबईत सभेचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये खुद्द राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलणार आहेत. तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी भाजपनेदेखील सभा घेणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे भाजप आणि त्यांच्या नेत्यांवर नेमकं काय बोलणार हे महत्त्वाचे आहे. तर, मुख्यमंत्र्यांनी 14 मे रोजी केलेल्या भाषणावर फडणवीस त्यांच्या खास शैलीत कसे उत्तर देणार हे समोर येणार आहे. दरम्यान, भाजपतर्फे मुंबईत भाजपची या महिन्यातील दुसरी मोठी सभा असणार असून, उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संजय पांडे यांच्याकडून या सभेचे आयोजन करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipith Highway villages list : शक्तिपीठ महामार्ग जाणाऱ्या गावांची यादी आली समोर, कोल्हापूर ७३ तर सांगली जिल्ह्यातील २५ गावांचा समावेश

France Gold: फ्रान्सची ‘गोल्ड गेम’ स्ट्रॅटेजी! अमेरिकेत ठेवलेल्या सोन्यातून कमावले तब्बल 1.37 लाख कोटी; काय होता प्लॅन?

झी मराठीच्या मालिकांची वेळ बदलली! 'लक्ष्मीनिवास' आणि सावळ्याची जणू सावली' आता दुपारी दिसणार; पण किती वाजता?

Latest Marathi News Live Update : पुण्याच्या वारजेमध्ये वाहतूक पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न; मद्यधुंद चालक अटकेत

सुरकुत्या,पिंपल्स, निस्तेज त्वचा? ‘हे’ 5 सुपरफूड्स वाढवतील कोलेजन अन् देतील ग्लो!

SCROLL FOR NEXT