मुंबई

'कनफ्युजन ही कनफ्युजन हैं' भाजपाचा शिवसेनेवर प्रहार

दीनानाथ परब

मुंबई: कोरोना व्हायरसची (corona virus) दुसरी लाट आल्यापासून लसीकरणाबद्दल मोठ्या प्रमाणावर जागरुकता निर्माण झाली आहे. मुंबईत नागरिक मोठ्या संख्येने लसीकरण केंद्रांवर (vaccination drive) येत आहेत. पण लसीच्या कमतरतेमुळे डोस घेतल्याशिवयाच त्यांना माघारी परतावे लागतेय. लसीकरण केंद्रांबाहेर नागरिकांच्या मोठ मोठ्या रांगा लागल्याचे चित्र दिसते. (Bjp slam shivsena over corona vaccination drive in mumbai)

काही लसीकरण केंद्रांवर गोंधळ उडाल्याच्याही बातम्या आल्या आहेत. कोव्हॅक्सिनच्या ५.५० लाख डोसची आवश्यकता असताना, फक्त ३६ हजार डोस राज्य सरकारला मिळाले आहेत. राज्य सरकार यासाठी केंद्र सरकारला जबाबदार ठरवत आहे. लसीकरणावरुन नागरिकांना जे अनुभव येत आहेत, त्यावरुन मुंबई भाजपाने एक व्हिडीओ टि्वट करुन महापालिकेत सत्ता असलेल्या शिवसेनेला टोला लगावला आहे.

या गमतीशीर व्हिडिओमधुन लसीकरणाचा उडालेला बोजवारा दाखवण्यात आला आहे. लसीकरणासाठी नागरिकांच्या लांबच लांब लागलेल्या रांगा व्हिडिओमध्ये दिसतात. 'कनफ्युजन ही कनफ्युजन हैं सोल्युशन का पत्ता नाही' या थ्री इडियटमधल्या गाण्याच्या ओळी या व्हिडीओमध्ये आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला कमिन्सचा जोरदार धक्का! रोहित शर्माला 4 धावांवरच धाडलं माघारी

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT