File Photo 
मुंबई

मनसेच्या महामोर्चाला भाजपचा पाठिंबा? 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गोरेगाव येथे नुकत्याच झालेल्या पहिल्या महाअधिवेशनात हिंदुत्वाची भूमिका घेतली आणि झेंड्याचा रंग भगवा करून शिवमुद्रा स्वीकारली. त्यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पाकिस्तानी व बांगलादेशी घुसखोरांविरोधात 9 फेब्रुवारीला विराट मोर्चा काढण्याची घोषणा केली. या शक्तिप्रदर्शनासाठी मनसेने तयारी सुरू केली असून, मोर्चात भाजपचे कार्यकर्ते सहभागी होण्याची शक्‍यता आहे. 

मनसे नेत्यांनी मुंबईसह कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील कार्यकर्त्यांना 9 फेब्रुवारीच्या मोर्चासाठी मोठ्या संख्येने लोकांना घेऊन येण्याचे आदेश दिले आहेत. या मोर्चात लाखो लोक सहभागी व्हावेत, यासाठी मनसे प्रयत्न करत आहे. या मोर्चाच्या माध्यमातून मोठे शक्तिप्रदर्शन करण्याचा मनसेचा मानस असून, नवी राजकीय सुरुवात करताना महामोर्चाद्वारे मुंबईसह महाराष्ट्राच्या राजकारणावर छाप पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

हा मोर्चा पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात असल्यामुळे राज ठाकरे यांनी एकप्रकारे केंद्र सरकारच्या सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीला (एनआरसी) पाठिंबा दिल्याचे मानले जाते. त्यामुळे मनसेच्या भूमिकेला पाठिंबा भाजप कार्यकर्ते मोर्चात सहभागी होण्याची शक्‍यता आहे. याबाबत भाजप किंवा मनसेकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. 

टी-शर्ट व टोप्या 
मनसेच्या महामोर्चासाठी विशेष टी-शर्ट आणि टोप्या बनवण्यात येत आहेत. काळ्या टीशर्टवर 9 आकडा आणि भगव्या टोपीवर शिवमुद्रा असेल. मनसेचे जिल्हाप्रमुख आणि शहरप्रमुखांना टी-शर्ट आणि टोप्या मोठ्या प्रमाणात तयार करण्याचे आदेश देण्यात आल्याचे कळते. 

मनसेचा हा मोर्चा पाकिस्तान आणि बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात आहे. राज ठाकरे यांच्या या मताशी सहमत असणारा कुणीही मोर्चात सहभागी होऊ शकतो. हा मोर्चा यशस्वी होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. 
- यशवंत किल्लेदार
, विभाग अध्यक्ष, मनसे 

BJP supports MNS's rally?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT