BJP try to convince Manda Mhatre
BJP try to convince Manda Mhatre  
मुंबई

मंदा म्हात्रेंची भाजपकडून मनधरणी 

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक आणि माजी मंत्री गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशामुळे दुखावल्या गेलेल्या भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी भाजपकडून मनधरणी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार रायगडचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी म्हात्रे यांची रुसवा दूर करण्याचा प्रयत्न केला. तसेच संदीप नाईक यांच्या प्रवेशाप्रसंगी उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. 

नवी मुंबईतील नाईक कुटुंब आणि मंदा म्हात्रे यांचे मागील अनेक वर्षांपासून असणारे हाडवैर सर्वश्रुत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये नाईकांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून म्हात्रेंनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर मंदा म्हात्रे भाजपमध्ये डेरेदाखल झाल्या. 2015 च्या विधानसभा निवडणुकीत मंदा म्हात्रे गणेश नाईकांच्या पराभवाच्या जायंट किलर ठरल्या होत्या. विधानसभेत नाईकांना पडल्यानंतर म्हात्रेंनी नंतर मागे वळून पाहिले नाही. ठाणे जिल्ह्यातुन सलग दोन वेळा शिवसेनेचा खासदार निवडून देण्यात म्हात्रेंचा हात होता. मात्र यानंतरही नाईक कुटुंब आज भाजप मध्ये जात असल्याने म्हात्रें नाराज झाल्या आहेत.

राष्ट्रवादीत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेली टीका त्यांना आठवत असल्याचे त्या सांगतात. नाईक कुटुंबाच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांमुळे म्हात्रें नाराज असल्याने मंगळवारी सकाळी रवींद्र चव्हाण यांनी म्हात्रें यांच्या बेलापूर मधील गौरव निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत त्यांनी म्हात्रेंना उद्या संदीप नाईक यांच्या प्रवेश प्रसंगी उपस्थित राहण्याची विनंती केली. तसेच खास फडणवीस यांनी आपल्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले असल्याचे सांगितले. 

भाजप पक्षात कोणाला घ्यायचे आणि कोणाला नाही याचा सर्वाधिकार पक्ष श्रेष्ठींचा आहे. पण उद्या होणाऱ्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहणार नाही.
मंदा म्हात्रे, आमदार भाजप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT