क्रांती रेडकर-चित्रा वाघ 
मुंबई

'काय जमाना आहे..' क्रांतीसाठी चित्रा वाघ यांचं खास टि्वट

नवाब मलिक यांनी एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना वर्षभराच्या आत तुरुंगात टाकणार असल्याचं विधान केलं आहे.

दीनानाथ परब

मुंबई: एकाबाजूला ड्रग्ज तस्करांविरोधात NCB ची धडाकेबाज कारवाई, आर्यन खानला (aryan khan) झालेली अटक या गोष्टी असताना, दुसऱ्याबाजूला या मुद्यावरुन जोरदार राजकारणही सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते नवाब मलिक (nawab malik) रोज पत्रकार परिषदते नवनवीन गौप्यस्फोट करुन समीर वानखेडे (sameer wankhede) यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आता या प्रकरणात सरळ, सरळ दोन गट पडल्याचे दिसत आहे.

नवाब मलिक यांनी एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना वर्षभराच्या आत तुरुंगात टाकणार असल्याचं विधान केलं आहे. त्यावर किरीट सोमय्या यांनी आक्रमक उत्तर दिलं आहे. "समीर वानखेडे यांच्या केसालाही धक्का लागला, तर महाराष्ट्राची जनता त्या माफीयाला सोडणार नाही" असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. आता चित्रा वाघ यांनी सुद्धा टि्वट करुन अभिनेत्री क्रांती रेडकरला पाठिंबा दिला आहे.

समीर वानखेडे हे क्रांती रेडकरचे पती आहेत."जेंव्हा सत्तेचा गांजा नसानसात भिनतो तेंव्हा सत्ताधाऱ्यांचं खरं रूप समोर येतं. क्रांती,महिला म्हणून मी तुझ्या सोबत आहे" असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

क्रांती रेडकरबद्दल एका वेबसाइटने चुकीचं वृत्त दिलं होतं. क्रांती रेडकरने त्यांना सुनावलं आहे. क्रांतीवर आयपीएल मॅच फिक्सिंगचा आरोप असल्याचं शीर्षक त्यांनी दिलं होतं. क्रांतीने ट्विट करत यावर आक्षेप घेतला आहे. संबंधित वेबसाइटला तिने खडेबोल सुनावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

पानिपताच्या लढाईनंतर या पेशव्याचं प्रेत विजयचिन्ह म्हणून अफगाणी सैनिक नेणार होते ! इतिहासातील अवघड प्रसंग

Photos : अंतराळातून दिसले पृथ्वीवर कोसळणाऱ्या प्रकाशस्तंभाचे अद्भुत दृश्य; शास्त्रज्ञही थक्क, पाहा आश्चर्यकारक फोटो..

Solapur News: 'मंगळवार, बुधवारी शाळा राहणार बंद'; वाढीव टप्पा अनुदानासाठी शिक्षक संघाचा निर्णय, नंतर मुंबईत आंदोलन

SCROLL FOR NEXT