black Cobra  sakal
मुंबई

Black Cobra : कल्याण मध्ये दुर्मिळ ब्लॅक कोब्रा घरात; दुसरा इंडियन कोब्रा मंदिरात..

बदलत्या हवामानामुळे भक्ष्याच्या शोधात पर राज्यातील दुर्मिळ असलेला ब्लॅक कोब्रा कल्याण जवळच्या वडवली गावातील एका घरात घुसला.

सकाळ वृत्तसेवा

कल्याण : बदलत्या हवामानामुळे भक्ष्याच्या शोधात पर राज्यातील दुर्मिळ असलेला ब्लॅक कोब्रा कल्याण जवळच्या वडवली गावातील एका घरात घुसला. तर दुसरा इंडियन कोब्रा कल्याण पश्चिमे एका मंदिरात घुसल्याच्या घटना घडल्या आहेत. या दोन्ही घटनांमधील कोब्रा नागांना सर्पमित्रांनी शिताफीने पकडल्या नंतर रहिवाशांनी सुटकेचा निश्व:स सोडला.

पहिल्या घटनेतील ब्लॅक कोब्रा कल्याण जवळच्या वडवली गावात राहणार्‍या दुर्गेश झा यांच्या घरात घुसल्याने घरातील झा कुटुंबाची भंबेरी उडाली. संपूर्ण कुटुंबाने जिवाच्या भीतीने घराबाहेर धूम ठोकली होती. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी वाॅर फाऊंडेशनच्या मदत क्रमांकावर संपर्क साधून घरात कोब्रा शिरल्याची माहिती दिली.

माहिती मिळताच सर्पमित्र रोमेश यादव व प्रतीक पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन या ब्लॅक कोब्र्याला शिताफीने पकडले. पकडलेला नाग कोब्रा जातीचा नाग असून तो मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्यांत मोठ्या प्रमाणात आढळून येतो. मात्र हा कोब्रा नाग कल्याणमध्ये आढळल्याने सर्पमित्रांनी आश्चर्य व्यक्त केले.

विशेष म्हणजे नागपंचमी व महाशिवरात्र हे सण महाराष्ट्रात मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात. या दोन्ही सणाच्या दिवशी या कोब्रा नागाचे खूप महत्व असते. या गोष्टीचा फायदा घेत मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा व ईतरभागातून गारुडी नागाच्या विष ग्रंथी काढून किंवा तोंड शिवून अवैधरीत्या हे नाग घेऊन महाराष्ट्रात घेऊन येतात.

ठीक ठिकाणी खेळ दाखवून व धार्मिक गोष्टींचा आढावा घेऊन पैसे कमवतात. मात्र त्यामुळे हे कोब्रा नाग जास्त दिवस जगत नसल्याने पर राज्यातून आलेले गारुडी हे कोब्रा नाग येथेच सोडून जातात. हा कोब्रा नाग असाच गारूड्याने सोडलेला असल्याची माहिती वाॅर फाऊंडेशनचे प्राणीमित्र रोमेश यादव यांनी दिली. या कोब्रा नागाला पकडण्यासाठी अनुराग लोंडे, योगेश कांबळे, पार्थ पाठारे, मंदार सावंत, रेहान मोतीवाल यांनी शिताफीने पकडून या कोब्रा नागाला कल्याण वनविभागाच्या ताब्यात दिले. हा कोब्रा नाग साडेपाच फूट लांबीचा आहे.

दुसऱ्या घटनेतील इंडियन कोब्रा जातीचा नाग कल्याण पश्चिम भागात असलेल्या एका देवळात घुसला होता. या नागाला पाहून मंदिरातील भक्तांनी बाहेर धूम ठोकली. त्यानंतर मंदिरात नाग शिरल्याची माहिती सर्पमित्र दत्ता बोंबे यांना भक्तानी दिली. माहिती मिळताच सर्पमित्र दत्ता बोंबे हे मंदिरात दाखल होऊन त्या इंडियन कोब्रा नागाला शिताफीने पकडले आणि पिशवीत बंद केले.नाग पकडल्याचे पाहून भक्तांनी सुटेकचा निश्वास घेतला.

हा नाग इंडियन कोब्रा जातीचा असून साडेतीन फुटाचा लांब आहे. या कोब्रा नागाला कल्याण वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या परवानगीने निर्सगाच्या सानिध्यात सोडून दिल्याची माहिती सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी दिली. बदलत्या हवामानामुळे विषारी-बिनविषारी साप मानवी वस्तीत भक्ष्याच्या शोधात शिरत आहेत. त्यामुळे मानवी वस्तीत साप दिसल्यास तातडीने सर्पमित्रांशी संपर्क साधावा, असे आवाहन सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी केले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : ट्रम्प सोडा आता केजरीवालांना सुद्धा हवा नोबेल पुरस्कार! गाजणारा दावा सोशल मीडियावर चर्चेत

Viral: नेत्यानंतर सामान्य जनताही 'डान्सिंग कार' मध्ये! कॉलेजसमोर गाडीत जोडपं आक्षेपार्ह अवस्थेत दिसलं, व्हिडिओ व्हायरल

Video : आज्जी बाई मोडकळीस आलेल्या पूलावरून निघाल्या, पण बघताना प्राण आले कंठाशी! तेवढ्यात....; पाहा धडकी भरवणारा व्हिडीओ

Nashik Crime : आरोग्य खात्यात नोकरीचं आमिष, ९० जणांची दीड कोटींची फसवणूक

Nashik Pipeline Scam : पाणीपुरवठा थेट जलवाहिनी दरात गोंधळ; महासभेला डावलून अटींमध्ये बदल

SCROLL FOR NEXT