covid center 
मुंबई

सार्वजनिक कोविड रुग्णालयातील तब्बल 'इतके' बेड्स रिकामे; लक्षणं नसलेल्या रुग्णांना महापालिकेनं दिला 'हा' सल्ला..  

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: सार्वजनिक कोविड रुग्णालयातील 500 बेड्स सध्याच्या परीस्थीतीत रिकामे आहेत. त्यामुळे महानगर पालिकेने आता लक्षण नसलेल्या कोविड बाधित रुग्णांना रुग्णालयात न जाता कोविड केंद्रात दाखल होण्याचा सल्ला दिला आहे. त्याच बरोबर जेथे शक्य आहे अशा ठिकाणी रुग्णांना घरी राहण्याचाा सल्लाही  देण्यात आला आहे. 

महानगर पालिकेने खासगी रुग्णालयातील 80 टक्के खाटा ताब्यात घेण्यास सुरवात केली आहे. मात्र,सध्याच्या परीस्थीतीत कोविड रुग्णालयातील 9 हजार 92 खाटांपैकी 8 हजार 570 खाटांवर रुग्ण आहेत.तर 1097 आयसीयू बेड्स पैकी 1080 बेड्सवर रुग्ण आहेत.

तर,4 हजार 650 ऑक्सिजन बेड्स पैकी 3 हजार 441 बेड्सवर रुग्ण आहेत.तर 442 व्हेटिलेटर बेड्स पैकी 375 बेड्सवर रुग्ण आहेत.रुग्ण्यालयाती खाटा प्रामुख्याने लक्षण असलेले रुग्ण, कोविड बाधित जेष्ट नागरीक तसेच इतर दिर्घ कालीन आजार असलेल्या रुग्णांसाठी वापरणे गरजेचे आहे.

केंद्र सरकारच्या नव्या नियमावली नुसार  लक्षणं नसणाऱ्या कोविड बाधित रुग्णांना घरीही एकांतात राहता येणार आहे. त्याच बरोबर अशा रुग्णांना पालिकेच्या कोविड केंद्रात राहाता येईल. याबाबत पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत मार्गदर्शन करण्यात येईल असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. महापालिकेच्या कोविड केंद्रात 25 हजार बेड्स तयार आहेत. तेथे फक्त 3 हजारच्या आसपास रुग्ण दाखल आहेत.

हमी पत्र दिले तरच:

लक्षण नसलेल्या केविड बाधित रुग्णाला घरीच एकांतात राहायचे असल्यास त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेण्यात येईल. तसेच आरोग्य विभागाकडून पाहाणी झाल्यानंरच याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल. तसेच घरातील एक व्यक्ती आरोग्य विभागाच्या संपर्कात राहील.तसेच इतर नियमावली आज राज्य सरकारने प्रसिध्द केली आहे. 

BMC adviced asymptomatic patients to admit in covid care center

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT