मुंबई

BMC बॉऊन्सर नियुक्तीचा वाद आता थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी

समीर सुर्वे

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान करणारा खासगी बाउन्सर नियुक्तीचा प्रस्ताव शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेनेने मंजूर केला. त्यामुळे आता हा वाद मुख्यंमत्री उध्दव ठाकरे यांच्या दरबारी गेला आहे. भाजपने हा प्रस्ताव रद्द करण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र पाठवले आहे.

महापालिका प्रशासनाने 32 कोटी रुपये खर्च करुन खासगी बाउन्सर नियुक्तीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मांडला होता. मात्र, या निवीदा प्रक्रियेत घोटाळ्याचा आरोप झाल्यावर हा प्रस्ताव रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. मात्र, शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव शिवसेनेने मंजूर केला. प्रशासनाने हा प्रस्ताव मागे घेण्याबाबत बैठकीत कोणतीही सुचना मांडली नाही. त्यामुळे नियमाप्रमाणे निर्णय घेऊन प्रस्ताव मंजूर करण्यात आला असे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले. मात्र, प्रशासनाने हा प्रस्ताव मागे घेण्याबाबत सुचना मांडली असल्याचा दावा समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी सांगितले.

भाजपचे विनोद मिश्रा यांनी सुरवातीपासून या प्रस्तावाला विरोध केला आहे. या 32 कोटी रुपयांचा प्रस्तावात 8 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर, पालिका तब्बल 3 हजार खासगी बाउन्सर नियुक्त करणार असून त्यासाठी 222 कोटी रुपये खर्च करण्याचा घाटा घातला आहे. त्यात किमान 40 कोटी रुपयांचा घोटाळा असू शकेल. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील रुग्णांलयांसाठी बाऊन्सर नियुक्त करण्याचा प्रस्ताव रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहिले असल्याचे मिश्रा यांनी सांगितले.

( संपादन - सुमित बागुल )

BMC to appoint private bouncers conflict opposition writes letter to CM thackeray

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Tiger 4 : ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का ! १४ आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात? शिवसेनेच्या आमदाराचा मोठा दावा

Rahul Gandhi: ‘एमपीएससीवर भाजपचा कब्जा, विश्वासार्हता उद्ध्वस्त’; राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल

अर्थबोध : ‘जीडीपी’च्या आकडेवारीचे वास्तव काय?

म्युच्युअल फंड : लाइफ सायकल फंड : उद्दिष्टपूर्तीचे साधन

आजचे राशिभविष्य - ०७ सप्टेंबर २०२६

SCROLL FOR NEXT