BMC Election 
मुंबई

BMC Election: मुंबई हायकोर्टाचा निवडणूक आयोगाला दणका; मुंबई महापालिकेची निवडणूक अद्याप का घेतली नाही?

मुंबई महापालिका निवडणुका कधी होणार? या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई महापालिका निवडणुका कधी होणार? या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही. जानेवारी महिन्यात महापालिका निवडणुका होण्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. मात्र, अजूनही काहीच निर्णय नसल्याने निवडणूक अद्याप का घेतली नाही? असा सवाल मुंबई हायकोर्टाने निवडणूक आयोगाला विचारला आहे.(BMC Bombay high court election commission maharashtra )

मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील 24 महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांसह पंचायत समितीच्या निवडणुका अद्याप का घेतल्या नाहीत? अशी विचारणा सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. या संदर्भात प्रतिज्ञापत्रावर आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.

Thackeray vs Shinde: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी आज पुर्ण होण्याचे संकेत

टी व्ही ९ ने दिलेल्या माहितीनुसार, दर पाच वर्षांनी निवडणुका घ्याव्यात. या घटनेनं घातलेल्या नियमाचं राज्य निवडणूक आयोगानं उल्लंघन केलं आहे. तसेच आयोगाची ही कृती देशद्रोही असल्यानं याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करत मुंबईतील रहिवासी रोहन पवारनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर 27 फेब्रुवारी या प्रकरणावर सुनावणी झाली. निवडणूक आयोगाचे अधिकार कोणीच हिरावून घेऊ शकत नाहीत, निवडणुका प्रक्रिया राबवण्याचा आयोगाचा अधिकार अबाधित आहे.

Manipur Earthquake : पहाटे मणिपूरला भूकंपाचे धक्के; तीव्रता 3.2 रिश्टर स्केल

तरीही निवडणूक आयोगाकडून निवडणुका का घेतल्या जात नाहीत? असा प्रश्न याचिकाकर्त्याच्यावतीनं त्यांचे वकील अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी युक्तिवाद करताना उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET SCAM : नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट ! सीबीआयच्या अटकेत असलेल्या मनीषा मांढरे यांचे कॉलेजकडून निलंबन

ITR Update: आयकर विभागाने जारी केले सर्व ITR फॉर्म! तुमच्यासाठी कोणता योग्य? ऑनलाइन रिटर्न कसा भराल? जाणून घ्या

Kerala CM VD Satheesan : कोण आहेत केरळचे नवे मुख्यमंत्री व्ही.डी. सतीशन? 'इतक्या' संपत्तीचे आहेत मालक...

Latest Marathi News Live Update : NEET पेपरफुटीचं प्रकरण तापलं, पुण्यात NSUI कडून आंदोलन, पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात

Pune Hospital: माणुसकीला काळिमा! पुण्यातील हॉस्पिटल वाद चिघळला, १३ तासांचे बिल ३.२५ लाख, मृतदेह रोखून धरल्याचा आरोप, राष्ट्रवादीचे नगरसेवक आक्रमक..

SCROLL FOR NEXT