hotel rooms 
मुंबई

मुंबईतील 88 हॉटेल्स राखीव; का आणि कुणासाठी? वाचा...

सकाळवृत्तसेवा

मुंबई : लॉकडाऊनमुळे जगभरात अडकलेल्या भारतात  आणण्यासाठी मोहिम सुरु झाली असून 7 विमानातून 1900 प्रवासी पहाटेपर्यंत मुंबईत दाखल होणार आहे. त्यातील मुंबई बाहेरील प्रवाशांची तपासणी करुन त्यांच्या मूळ जिल्ह्यात पाठविण्यात येणार आहे. या सर्व प्रवाशांचे स्थानिक प्रशासनाच्या निगराणीखाली 14 दिवस विलगीकरण करण्यात येणार आहे. 

परदेशातून येणाऱ्या भारतीयांच्या विलगीकरणासाठी मुंबईतील 88 हॉटेल्समधील 3 हजार 343 खोल्या सज्ज करण्यात आल्या आहेत. मात्र, हॉटेलच्या खोल्यांचे भाडे प्रवशांना द्यायचे असून 14 दिवस त्यांना तेथेच राहावे लागणार आहे. 

बांगलादेश, फिलिपिन्स, सिंगापूर, मलेशिया, ब्रिटन आणि अमेरिका या देशांमधून हे नागरिक मुंबईत परतणार आहेत. तर बारा देशातून, ६४ विमान फेऱ्यांमधून एकूण 14,800 प्रवासी भारतात येणार आहेत. परदेशातून आलेल्या नागरिकांना सुरवातीला हॉटेलमध्ये ठेवून त्यांची प्राथमिक तपासणी करण्यात येईल. यात कोरोना बाधित व्यक्तींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. तर कोरोनाची बाधा नसलेल्या मुंबई बाहेरील प्रवाशांना त्याच्या जिल्ह्यात जाण्याची सोय करण्यात येईल. मुंबईतील प्रवाशांना हॉटेल्समध्ये 14 दिवस राहावे लागणार आहे. मुंबीतील विविध 88 हॉटेलमध्ये एकूण 3 हजार 343 खोल्या आरक्षित करण्यात आले आहेत. यामध्ये दोन, तीन, चार, पंचतारांकित तसेच वेगवेगळ्या हॉटेल्स सोबत अपार्टमेंट हॉटेल, ओयो बजेट हॉटेलचाही  समावेश आहे.

घरातही 14 दिवसांसाठी क्वारंटाईन
हॉटेल्समध्ये 14 दिवसात कोरोनाची बाधा नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या प्रवाशांना घरी पाठविण्यात येईल. मात्र, घरी गेल्यावरही त्यांना 14 दिवसांसाठी क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar price: साखर दरवाढीचा खेळ संपला! भाव कधी कमी होणार? सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी

अमरावतीतल्या 'त्या' वाघिणीचा अचानक मृत्यू, काही तांसापूर्वी वनविभागाने केलं होतं बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

मोदी सरकार देणार स्वस्त भाड्याची घरं; शहरात राहणाऱ्यांसाठी मोठी योजना

हिरा ठाकूर यांचा काँग्रेस प्रवेश, भाजपाला मोठा धक्का; राजकीय वर्तुळात खळबळ

MPSC Paper Leak : ‘पुरावा दिल्यास क्षणभरही पदावर राहणार नाही’; एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार

SCROLL FOR NEXT