BMC sakal media
मुंबई

बोरिवली उड्डाण पुलाचा बांधकामाचा खर्च तब्बल ३०० टक्क्यांनी वाढला; वाचा सविस्तर

समीर सुर्वे

मुंबई : बोरीवली येथील स्वामी विवेकानंद मार्गावरील उड्डाण पुलाचा बांधकामाचा (borivali bride expenses) खर्च तब्बल 300 टक्क्यांनी वाढला आहे. 161 कोटी रुपयांचा खर्च 651 कोटी रुपयां पर्यंत पोहचला आहे. जून महिन्यात स्थायी समितीने वाढीव खर्चाला मंजूरी (permission) देण्याचा प्रस्ताव (proposal) फेटाळला होता. तो, प्रशासनाने (bmc) पुन्हा मंजूरीसाठी स्थायी समितीच्या पटलावर मांडला होता. मात्र, हा प्रस्ताव आयत्यावेळी आल्याने त्यावर पुढल्या आठवड्यात निर्णय घेण्याची मागणी भाजपने (BJP) केल्याने हा प्रस्ताव राखून ठेवण्यात आला.

पुलाच्या बांधकामाचा खर्च तब्बल ३०० टक्क्यांनी वाढल्याने नव्याने निवीदा मागवून हा पुल बांधण्यात का नाही असा प्रश्‍न त्यावेळी उपस्थीत करण्यात आला होता.सभागृह नेत्या तृष्णा विश्‍वासराव यांनी उपसुचना मांडून हा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली.त्यानुसार हा प्रस्ताव रद्द करण्यात आला होता.मात्र,आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत पुन्हा हा प्रस्ताव मंजूरीसाठी मांडण्यात आला.हा प्रस्ताव आयत्यावेळी सादर करण्यात आला आहे.त्यामुळे पुढल्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा करुन निर्णय घेण्याची मागणी भाजपने केली.त्यानुसार हा प्रस्ताव राखून ठेवण्यात आला आहे.

बोरीवली कोराकेंद्र येथे आर.एम.भट्टड व स्वामी विवेकानंद मार्ग या जंक्शनवरील कल्पना चावला चौकात उड्डाण पुलाचे बांधकाम करण्यासाठी महानगर पालिकेने 2018 मध्ये मंजूरी दिली होती.नोव्हेंबर 2018 पासून हे काम सुरु करण्यात आले.मात्र,नंतर या पुलाच्या बांधणीत आणि लांबी वाढविण्याचा निर्णय महानगर पालिकेने घेतला.त्यासाठी निवीदा न मागवता त्याच कंत्राटदाराला महानगर पालिकेने काम देण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे हा खर्च 161 कोटी रुपयां वरुन 651 कोटी रुपयांवर जाणार होता.प्रशासनाने या प्रस्तावात खर्च वाढीची कारणेही नमुद केली आहेत.त्यात,भारतीय मानंक कोड मध्ये नव्या सुधारणा लागू झाल्या.त्यामुळे पुलाच्या सुरक्षेसाठी बेअरिंगमध्ये सुधारणा करण्यात आल्या.तसेच,काही स्पॅनच्या लांबीत वाढही आवश्‍यक आहे.तसेच,पुलाची लांबी वाढविण्याचेही प्रस्तावित आहे.त्यामुळेही हा खर्च वाढल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kunbi Reservation: ओबीसी बचाव आंदोलनाची धार बोथट! पाच नेत्यांच्या पाच भूमिका; काही पक्षात अडकले, काहींना इगो प्रॉब्लेम?

Shocking : भारत-पाकिस्तान सामना पाहण्यात चाहत्यांना रस राहिला नाही? तिकीट विकल्याच जात नाही, कारण काय तर...

Nepal Protests: भारतात लष्करी शिक्षण घेणारा व्यक्ती होणार नेपाळचा सर्वेसर्वा, Gen Z च्या तांडवानंतर मोठी जबाबदारी

Latest Marathi News Updates : शेतात काम करताना दुर्दैवी घटना, इलेक्ट्रिक वायरचा धक्का लागून जागीच मृत्यू

Adani: साडेसात हजार कोटी द्या! अदाणींची ‘परिवहन’कडे मागणी, राज्य शासनाचे ५०० कोटी बुडणार; नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT