मुंबई

मृतदेह झाकण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बॅग्जची 5 पट जास्त किंमतीत खरेदी?

सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोविड बाधित मृतदेह झाकण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बॉडी बॅग महापालिका 5 पट जास्त किंमतीत खरेदी करत आहे. बाजारात या बॅग 1 हजार ते दिड हजार रुपयांमध्ये या बॅग मिळत असताना पालिका 6 हजार 719 रुपयांमध्ये या बॅग खरेदी करत आहे. मात्र,बॅगच्या तांत्रिक बाबींची पडताळणी करुन या किंमतीत खरेदी केली असून आता फेर निविदा मागवल्या जात आहेत.

कोविड बाधित मृतदेह प्लास्टिकच्या बॅंग मध्ये गुंडाळून तो नातेवाईक अथवा पोलिसांच्या ताब्यात दिला जातो. या बॅग महापालिका गेल्या दोन महिन्यांपासून वेंदात इनोटेक प्रायव्हेट लिमीटेड या कंपनीकडून प्रत्येकी 6 हजार 719 रुपये दराने खरेदी करत आहे.या कंपनीचा व्यवसाय मेटल कास्टिंग असून बाजारात हे बॉडी बॅग 1 हजार ते दिड हजारात उपलब्ध आहेत. असा आरोप सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी केला. पालिका प्रशासनाने हे आरोप नकारले आहेत.

दोन महिन्यांपुर्वी नोविड काढून केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनांनुसार तांत्रिक तपासणी करुन या कंपनीच्या बॅग खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना बाधित मृतदेहापासूनही बाधा होऊ शकते. तसेच शरिरातील द्रव बॅगेबाहेर येऊ नये अशा लिक प्रुफ बॅग पालिकेला लागतात. या सर्वाची पडताळणी करुन या कंपनीकडून बॅक खरेदी करण्यात येत होत्या असं महापालिका आयुक्त पी. वेलारसू यांनी सांगितले. तसेच, आता पुन्हा निविदा मागविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

केद्र सरकारच्या संकेतस्थळावर या कंपनीची डेडबॉडी बॅग पुरवठादार म्हणूनही नोंदणी असल्याचे त्यांनी सांगितले. 

is bmc buying dead body bags at five times higher rates read full report

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani Math : माधुरी हत्ती नांदणी मठातील धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? वनताराकडून सूचनांची आली यादी

AI Superintelligence Race: AI माणसांना संपवू शकतो; Anthropic च्या संशोधकाने राजीनामा देत दिला गंभीर इशारा!

Fraud Case: डॉक्टरची 2 कोटी 24 लाखांची फसवणूक, ठेका मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे उकळल्याचा आरोप

Latest Marathi News Live Update : ३५ दिवसांचा दुष्काळी खंड संपला; यवतमाळ-वणीत पावसाची दमदार हजेरी, पिकांना जीवदान

आरक्षणावरून सुरू झाला वाद अन् कॉलेजमध्ये पेटलं वातावरण! कसा आहे ‘जयंती २’? वाचा Review

SCROLL FOR NEXT