मुंबई

नागपुरातील कडकडीत लॉकडाऊननंतर मुंबईच्या लॉकडाऊनबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती

पूजा विचारे

मुंबई: फेब्रुवारी महिन्यापासून  मुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे.  मार्च महिन्यातही गेल्या आठवडाभरात हजाराच्या संख्येने रुग्ण सापडत आहेत. मुंबई आंशिक लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असे  महापौर किशोरी पेडणेकर यांनीही नमूद केलं. अशातच मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मुंबईत लॉकडाऊन होणार नसल्याचं म्हटलं आहे. 

आतापर्यंत लॉकडाऊन करण्याची कोणतीही योजना नसल्याचं चहल यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे चहल यांच्या स्पष्टीकरणाने मुंबईकरांना एकअर्थी दिलासा मिळाला आहे. 

नागपूरात लॉकडाऊन तर पुण्यात काही प्रमाणात निर्बंध टाकण्यात आले आहेत. मात्र मुंबईत अजून कोणताही लॉकडाऊनचा विचार नसल्याचं मुंबई महानगर पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनीही स्पष्ट केलं आहे. 

सध्या मुंबईत कोरोना परिस्थिती नियंत्रणात असल्याचं पालिका प्रशासनाचे स्पष्ट केलं आहे. 90 टक्के रुग्ण हे इमारतीतील आहेत. झोपडपट्टीत रुग्ण कमी, असल्याचं काकाणी यांनी स्पष्ट केलं आहे. 

सध्या लॉकडाऊन विषय पालिकेच्या अजेंडावर नाही, असं सांगत काकाणी यांनी नागरिकांनी आता कोविडची त्रिसूत्री पाळावी. याचं पालन केलं तर लॉकडाऊनची वेळ येणार नाही, असं म्हटलं आहे. 

मुंबईतील गर्दीच्या ठिकाणी विशेष लक्ष देत आहोत. येथे नियमांचं पालन व्हावं यासाठी पालिकेची पथक फिरत आहेत. लोकल सेवेपेक्षा विवाह कार्यक्रम, पब पार्टी मध्ये होणारी गर्दी कोरोना वाढवत आहे. कारण उच्चभ्रू इमारतीमध्ये रुग्ण वाढत आहेत, असंही त्यांनी सांगितलं आहे. 

पालिका लसीकरणावर भर देत आहे. पालिकेच्या आणि खासगी रुग्णालयात कोरोना लस देण्याची सोय ही आता 24 असणार असल्याची माहिती सुरेश काकाणी यांनी दिली आहे. 

BMC Commissioner Iqbal Chahal told mumbai no plan of imposing lockdown

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Traffic: बाप्पाच्या आगमनात खड्ड्यांचे विघ्न! मार्गावर तब्बल ८०० खड्ड्यांच साम्राज्य

Pune Election: नव्या प्रभाग रचनेमुळे १६ प्रभागांमध्ये गडबड; ६४ नगरसेवकांवर थेट परिणाम; 'या' पक्षांना बसणार फटका

Pune News : पतीला अर्ध यकृत दिल, प्रत्यारोपणनंतर पत्नीसह दोघांचाही मृत्यू; पुण्यातील रुग्णालयात घटनेने खळबळ

दोन महिन्यात उजनीतून सोडले 97 TMC पाणी! उजनी धरणाचे 16 दरवाजे 3 फुटाने उघडले; भीमा नदीतील विसर्ग 45 हजार क्युसेक, पंढरीतील पूरस्थिती आज पूर्वपदावर

Mumbai News: पावसाची पुन्हा विश्रांती पण मुंबईकरांना दिलासा, सातही धरणात ९५ टक्के पाणीसाठा; पाहा आकडेवारी

SCROLL FOR NEXT