corona virus update sakal media
मुंबई

पाचव्या सेरो सर्वेतून मुंबईला दिलासा; 86.64 टक्के आढळली कोविड 19 प्रतिपिंडे

भाग्यश्री भुवड

मुंबई : मुंबई महापालिकेने (BMC) केलेल्या पाचव्या सेरो सर्वेतून (Sero survey) मुंबईला दिलासादायक बाब समोर आली आहे. मुंबईतील 86.64 टक्के मुंबईकरांमध्ये कोविड 19 प्रतिपिंडे (corona Antibodies) आढळली आहे. मात्र, पालिकेने कोविड 19 संबंधित सर्व नियमांचे पालन करण्याचे (Corona rules) आवाहन केले आहे.  कोविडच्या पार्श्वभूमीवर पालिकेने केलेल्या पाचव्या सेरो सर्वेचा अहवाल (report) नुकताच जाहिर करण्यात आला आहे.

पूर्ण किंवा अंशत: लसीकरण झालेल्यांपैकी 90.26 टक्के नागरिकांमध्येही प्रतिपिंडे आढळली आहेत तर न झालेल्‍यांपैकी 79.86 टक्‍के नागरिकांमध्‍ये प्रतिपिंड आढळली आहेत. विशेष म्‍हणजे, मागील सर्वेक्षणांच्‍या तुलनेत झोपडपट्टी तसेच बिगर झोपडपट्टी परिसरांमध्‍ये देखील प्रतिपिंड विकसित होण्‍याचे प्रमाण वाढल्‍याचा निष्‍कर्षही यातून समोर आला आहे. दरम्‍यान, प्रतिपिंड आढळले तरी ते किती प्रमाणात सुरक्षितता प्रदान करतील, याची वैद्यकीय हमी देता येत नाही. त्‍यामुळे, नागरिकांनी ढिलाई न करता, कोविड विषाणू संसर्ग होवू नये म्‍हणून मास्‍कचा योग्‍य उपयोग, हातांची नियमित स्‍वच्‍छता, सुरक्षित अंतर इत्‍यादी कोविड अनुरुप वर्तणूकीचे पालन करणे आवश्‍यक आहे, असे स्‍पष्‍ट करण्‍यात येत आहे.

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांमध्‍ये आतापर्यंत तीनवेळा सेरो चाचणी करण्यात आली आहे. तर एकदा लहान मुलांचे विशेष सेरो सर्वेक्षण करण्‍यात आले आहे.  या चार सर्वेक्षणानंतर, कोविडच्‍या संभाव्‍य तिसऱ्या लाटेच्‍या पार्श्‍वभूमीवर, पुन्‍हा एकदा रक्त नमुने विषयक सर्वेक्षण केले गेले. 18 वर्षांपेक्षा अधिक असलेल्‍या नागरिकांमध्‍ये हे सेरो सर्वेक्षण केले आहे. महानगरपालिकेचे दवाखाने तसेच खासगी वैद्यकीय व्‍यावसायिक यांच्‍याकडे येणाऱ्या विविध समाज घटकातील रुग्‍णांचा यामध्‍ये समावेश होता. अशा रितीने सर्व 24 प्रशासकीय विभागात मिळून एकूण 8 हजार 674 नागरिकांचे रक्‍त नमुने संकलित करुन त्‍याची चाचणी करण्यात आली.

पाचव्‍या सेरो सर्वेक्षणातील महत्त्वाचे मुद्दे

सर्वेक्षणात केलेल्‍या चाचण्‍यांपैकी एकूण 86.64 टक्के नागरिकांमध्ये सेरो सकारात्मकता

 झोपडपट्टी परिसरांमध्‍ये सुमारे 87.02 टक्‍के तर बिगर झोपडपट्टी भागांमध्‍ये सुमारे 86.22 टक्‍के नागरिकांमध्‍ये प्रतिपिंडे

पुरुषांमध्ये 85.07 टक्के तर महिलांमध्ये 88.29 टक्के सेरो सकारात्मकता

सुमारे 65 टक्‍के नागरिकांनी कोविड लस घेतली असून उर्वरित 35 टक्‍के नागरिकांनी कोविड लसीचा एकही डोस घेतलेला नाही.

लस घेतलेल्‍या नागरिकांचा विचार करता, सुमारे 90.26 टक्‍के नागरिकांमध्‍ये प्रतिपिंड विकसि‍त झालेली आहेत.

लस न घेतलेल्या नागरिकांपैकी सुमारे 79.86 टक्‍के नागरिकांमध्‍येही प्रतिपिंड विकसित झाल्‍याचे दिसून आले.

20 टक्‍के हे  नमुने आरोग्‍य कर्मचाऱ्यांचे, या गटात प्रतिपिंड असण्‍याचे प्रमाण हे 87.14 टक्के

80 ते 91 टक्‍के दरम्‍यान सेरो-सकारात्‍मकता / प्रतिपिंड अस्‍त‍ित्‍व आढळून आले आहे..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT