Vaccine Sakal
मुंबई

लशींसाठी पालिकेची धावाधाव; उत्पादक कंपन्यांशी बोलणी सुरू

२१ जूनपासून १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचं लसीकरण सुरु होणार आहे.

मिलींद तांबे

मुंबई : येत्या २१ जूनपासून १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचं लसीकरण सुरु होणार आहे. याविषयीची माहिती केंद्र सरकाराकडून देण्यात आली होती. केंद्राने स्पष्ट केल्यानंतर महापालिकादेखील सज्ज झाली असून ५०० लसीकरण केंद्रांवर ही मोहीम राबवण्यात येणार आहे. मात्र, ऐनवेळी पालिकेला लशींसाठी धावाधाव करावी लागत आहे. सध्या लस उपलब्ध नसल्यामुळे लस उत्पादक कंपन्यांसोबत चर्चा सुरु आल्याची सांगण्यात येत आहे. याविषयी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. (bmc-demands-to-provide-corona-vaccine-for-mumbai)

मुंबईमध्ये मार्चपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर वाढला. हा जोर कमी करण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे. कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाल्याने नागरिकांनी लसीकरणाला गर्दी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आता लसींचा मात्र तुटवडा भासू लागला आहे. लसीकरण मोठ्या संख्येने होत असताना लस उत्पादक कंपन्यांकडून लसीचा पुरवठा कमी होत होता. यामुळे अनेक वेळा लसीकरण बंद ठेवावे लागले होते.

मुंबईमध्ये लसीचा तुटवडा दूर करण्यासाठी पालिकेने ग्लोबल टेंडर काढून 1 कोटी लसीचे डोस विकत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणताही पुरवठादार त्यात पात्र न ठरल्यामुळे ते ग्लोबल टेंडर रद्द करण्यात आले. ग्लोबल टेंडर रद्द झाल्याने आता लसीकरणासाठी लस उपलब्ध कशी करायची हा नवा पेच पालिकेसमोर आहे. म्हणूनच, पर्याप्त स्वरूपात लसींचा पुरवठा व्हावा यासाठी पालिकेने लसीच्या उत्पादक कंपन्यांसोबत बोलणी सुरु ठेवली आहे. कंपन्यांकडून लस मिळवण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती काकाणी यांनी दिली. 

लस उपलब्ध झाली तरच सर्व केंद्र सुरू राहतील

"मुंबईमध्ये सध्या लसीकरण करण्यासाठी पालिका, सरकारी आणि खासगी 300 लसीकरण केंद्र सुरु आहेत. ही लसीकरण केंद्र वाढवण्यात येत आहेत. मुंबईत आणखी 200 लसीकरण केंद्र वाढवून 500 लसीकरण केंद्र सुरु करणार आहोत. जास्त प्रमाणात लस आल्यास ती सर्व लसीकरण केंद्र सुरु केली जातील. लस जास्त प्रमाणात आली नाही तर काही लसीकरण केंद्र सुरु ठेवली जातील", असे काकाणी यांनी सांगितले.

संपादन : शर्वरी जोशी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT