Amit Shah Sakal
मुंबई

Amit Shah : अमित शहांच्या मुंबई दौऱ्यात ठरणार मिशन BMC ची रणनीती

सकाळ डिजिटल टीम

Amit Shah Mumbai Visit : एकीकडे शिवसेना आणि शिंदे गटाच्या वादावर अंतिम तोडगा निघालेला नाही. त्यामुळे सत्तांतराचा पेच अजूनही कायम असून, या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. त्यात आगामी काळात राज्यातील मुंबईसह राज्यातील प्रमुख महानगर पालिकांच्या निवडणुकांच बिगुल वाजणार आहे. त्याआधीच विजयाची पताका उंचवण्यासाठी भाजपने हालचाली करण्यास सुरूवात केली असून, येत्या 5 सप्टेंबर रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्याचवेळी भाजप मिशन मुंबई महापालिकेचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

अमित शहांच्या मुंबई दौऱ्यात प्रथम शहा लालबाग आणि सिद्धीविनायकाचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर भाजपच्या मिशन मुंबई महापालिकेवरील विजयासाठी भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. यामध्ये BMC भाजपच्या हाती येण्यासाठी शहांच्या नेतृत्त्वाखाली बैठक घेतली जाणार आहे. .गेल्या पंचवीस वर्षापासून मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. ही सत्ता काबीज करण्यासाठी भाजपकडून विशेष रणनिती आखली जाणार आहे.

असा असणार अमित शहांचा मुंबई दौरा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या 5 सप्टेंबर रोजी मुंबईत दाखल होणार आहेत. यामध्ये ते सर्वात प्रथम लालबागच्या राजा आणि सिद्धीविनायकाचं दर्शन घेणार आहेत. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या घरातील गणपतीचे दर्शन घेणार असल्याचेही सांगितले जात आहे. त्यानंतर शहांच्या नेतृत्त्वाखाली मिशन मुंबई महापालिकेच्या विजयासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपला मोठा धक्का! अन्नामलाईंनंतर आणखी एका बड्या नेत्याने सोडली साथ, 'या' पक्षात करणार प्रवेश...

Mumbai Traffic: मुंबईकरांसाठी मोठा बदल! BKC मध्ये कार आणि बाईकला दर शुक्रवारी प्रवेशबंदी; कठोर नियमाचं कारण काय?

Pune Crime: बिबवेवाडीत डिलिव्हरी बॉयला धमकावून मारहाण; पोलिसांची धडाकेबाज कारवाई, दोघे अटकेत

IND vs AFG, ODI : रोहित शर्मा अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार की नाही? त्या Viral Video मुळे मिळालं स्पष्ट उत्तर

Pachod Crime : अवैध वाळु वाहतुक करणाऱ्या आठ चालक मालकाविरुद्ध गुन्हा; वाळूसह सव्वा तेहतीस लाखाचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT