devendra fadnavis and Uddhav Thackeray  esakal
मुंबई

Mumbai : मुंबईत भाजपाचे वाढले बळ! ठाकरेंच्या शिवसेनेसमोर खडतर आव्हान

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करून भाजपाला साथ दिली. आता अजित पवार यांनीही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात बंडखोरी करून भाजपा पाठिबा देत उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाले. त्यामुळे भाजपाचे बऴ वाढले असून मुंबईत महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गटाच्या अधिक अडचणी निर्माण करण्याची दाट शक्यता आहे. महापालिका निवडणुक महायुतीसाठी सोपी नसल्याचे दिसत आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी गेल्या वर्षीपासून भाजपाने सुूरू केली आहे. आशिष शेलार आणि राज ठाकरे यांच्या बैठकाही झाल्या. मुंबईत मनसे सोबत युती करण्याबाबत त्यांनी चाचपणी केली. मनसे सोबत युती करावी की करू नये याबाबत उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर भाजपाच्या मुबईती पदाधिका-यांची बैठक झाली.

या बैठकीत मनसेला सोबत घेतल्यास अमराठी मतदार बिथरतील. त्यामुळे त्यांना सोबत न घेणे फायद्याचे आहे. असा सूर बैठकीत निघाला. मनसे - भाजपा युती होणार नसल्याचे या बैठकीत एकमत झाले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पूत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी मुंबईत लक्ष घातले आहे. मुंबईच्या प्रश्नावर त्यांनी पालिका आयुक्त इक्बास सिंह चहल आणि विविध सनदी अधिका-यांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. नागरिकांच्या प्रश्नावर काम सुरू केले आहे. मुंबईच्या विकास प्रकल्पावर मुख्यमंत्री शिंदे यांनी भर दिला आहे.

आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपाला साथ दिली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने ते तयारीला लागतील. त्यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसही भाजपाला मदत करणार आहे. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत भाजपाची ताकद वाढणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला मुंबई महापालिका निवडणुक सोपी नसल्याचे दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT