bmc election politics political party shiv sena thackeray mahavikas aghadi
bmc election politics political party shiv sena thackeray mahavikas aghadi  sakal
मुंबई

BMC Election : मुंबईत फोडाफोडीच्या राजकारणाला येणार वेग

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबई महानगर पालिकेची निवडणूक जवळ येईल, तशी मतदार संघावर पकड असलेल्या माजी नगरसेवकांचा भाव वधारण्याची दाट शक्यता आहे. त्याची चाचपणी आतापासूनच मोठ्या राजकीय पक्षांनी सुरू केली आहे.

पालिकेची मागची टर्म काही नगरसेवक कमी पडल्यामुळे हुकल्याने भाजपाने आता बक्षीय बलाबल वाढविण्यासाठी शिवसेना ठाकरे गटासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांना लक्ष केल्याचे समजते. पालिकेतील सत्तासंघर्षात आता फोडाफोडीच्या राजकरणाला वेळ येणार आहे.

गेल्या फेब्रूवारी 2017 मध्ये मुंबई महानगर पालिकेची निवडणूक झाल्यानंतर लगेच 9 मार्च रोजी महापौर पदाची निवड झाली. महापौर पद मिळविण्यासाठी शिवसेना आणि भाजपामध्ये फोडाफोडीचे राजकारण रंगले होत.

भाजपाने पालिकेची सत्ता ताब्यात घेण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. मात्र शिवसेना मनसेचे सहा नगरसेवक फोडून मुंबईचे महापौरपद मिळविण्यात यशस्वी झाली. शिवसेनेचे 97 वर पोचलेले संख्याबळ भाजपाला तोडता आले नाही.

भाजपाला 83 जागांवर समाधान मानावे लागले. त्यावेळी भाजपच्या स्वप्नाला शिवसेनेने सुरुंग लावला. तो वचपा आता भाजपाला काढायचा आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या मदतीने भाजपाने मुंबईवर लक्ष केंद्रीत केले आहे.

राज्यात सत्ता असल्यामुळे मुंबई जिंकण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे मुंबई ताब्यात घेण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

महाविकास आघाडी विरूध्द शिंदे आणि फडणवीस असे महापालिका निवडणुकीचे चित्र असेल. सत्ता संघर्षाच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे खासदार आणि आमदारांना फोडले. मुंबईसह ठाणे, कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबई महापालिकांमधील माजी नगरसेवकांनाही फोडले. फोडाफोडीचे हे राजकारण पालिका निवडणूक जवळ येईल तसे वेगवान होण्याची चिन्हे आहेत.

2017 चे पक्षीय बलाबल

  • शिवसेना - 97

  • भाजपा -83

  • राष्ट्रवादी - 8

  • कॉंग्रेस - 29

  • मनसे- 1

  • सपा - 6

  • एमआयएम - 2

  • अभासे - 6

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना मोदी सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

SCROLL FOR NEXT