मुंबई

सर्वात मोठी बातमी - आता मुंबईतील सर्व दुकानं सातही दिवस सुरु राहणार, मद्यही पूर्वीप्रमाणे काउंटरवर मिळणार  

सुमित बागुल

मुंबई - मिशन बिगिन अंतर्गत मुंबईकरांसाठी मोठी बातमी समोर येतेय. एकीकडे मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या कमी होतेय. मुंबईतील अनेक कोविड सेंटर्स बंद केले जातायत. अनेक भागात कोरोना दुपटीचा दर १०० दिवसांच्या पुढे गेलाय तर मुंबईचा कोरोना रुग्णदुपटीचा दर ७२ दिवसांच्या वर आहे.

या पार्श्वभूमीवर आता मुंबईतील सर्व दुकाने उघडायला महापालिकेने परवानगी दिली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आता मुंबईत सगळ्या दुकानांना खुलं करण्यास सातही दिवस परवानगी असेल. या आधी सम विषम सूत्रानुसार दुकानं खुली करण्यास परवानगी देण्यात आली होती. आता मात्र सरसकट सगळ्याच  दुकानांसह दारूची विक्री करणाऱ्या दुकानांना काऊंटरवर विक्री करण्यास देखील परवानगी देण्यात आलेली आहे. पाच ऑगस्ट पासून सर्व दुकानं खुली करण्याची मुभा दिली गेलीये.

मिशिन बिगिन अंतर्गत बृहन्मुंबई महानगर पालिकेने एक परिपत्रक जारी केलंय. यामध्ये सकाळी ९ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत मुंबईतील सर्व दुकानं खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. सोबतच आता मद्य विक्री देखील पूर्वीप्रमाणे काउंटरवर करता येणार आहे. मद्याचं दुकानांना देखील सकाळी ९ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत आपली दुकानं सुरु ठेवता येणार आहे. येत्या ५ तारखेपासून मुंबईतील मॉल्स आणि शॉपिंग कॉप्लेक्स देखील सुरु होणार आहेत. दरम्यान मुंबईतील स्विमिंग पूल्स अद्याप खुले करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही नाहीत.   

bmc gave permission to all shopkeepers to keep their shops open for all seven days

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT