Covishield Vaccine Saptarang
मुंबई

BMC कडे कोव्हिशिल्डचे इतके लाख डोस, मुंबईकरांना उद्या मिळेल लस

लसीकरणाबाबत एक चांगली बातमी.

सकाळ वृत्तसेवा, भाग्यश्री भुवड

मुंबई: मुंबईत कोरोना लसीचा तुटवडा दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये लसीची कमतरता असल्यामुळे अनेक लसीकरण केंद्रे बंद झाली. ही सर्व बंद झालेली केंद्रे सोमवारपासून पुन्हा कार्यरत केली जाणार असून पालिकेकडून शासकीय आणि खासगी लसीकरण केंद्रांनाही लसीचे डोस दिले जाणार आहेत.

रविवारी संध्याकाळी पालिकेला दीड लाख कोव्हिशिल्ड लसीचे डोस मिळाले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.  मुंबई सेंट्रल येथील केंद्रातून हे डोस उपलब्ध झाले असून पालिका आणि खासगी लसीकरण केंद्रात उद्यापासून कोव्हिशिल्डचा डोस घेता येणार आहे.

सोमवारपासून सर्व केंद्रांवर कोरोनाची लस मिळू शकेल असेही सांगण्यात आले आहे. रविवारी लस उपलब्ध नसल्यामुळे केवळ 37 लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली होती, त्यामध्ये 7 खासगी लसीकरण केंद्रांचा समावेश होता. या लसीकरण केंद्रांवर उपलब्ध डोसनुसार लाभार्थ्यांना दुसर्‍या डोससाठी प्राधान्य दिले जात होते. यामुळे रविवारी अनेक लाभार्थ्यांना लसीविना केंद्रांकडून परत पाठवण्यात आले. पण, सोमवारी लाभार्थ्यांना या समस्येला पुन्हा सामोरे जावे लागणार नाही.

पालिकेला रविवारी संध्याकाळी दीड लाखाहून अधिक डोस मिळाले  असल्याची माहिती पालिकेचे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली. हे डोस सर्व केंद्रांमध्ये पुरविले जातील, जेणेकरून सर्व केंद्रे सोमवारपासून कार्यान्वित होतील असेही त्यांनी साांगितले.

दरम्यान, 132 लसीकरण केंद्रांपैकी 37 लसीकरण केंद्रांवर लसीचा दुसरा डोस असलेल्या लाभार्थ्यांना सर्वाधिक प्राधान्य दिले गेले असेही पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तर, कोव्हॅक्सिनचा मर्यादित साठा असून फक्त काहीच केंद्रांवर या लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Census 2026 40 Questions List : जनगणनेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! अनुसूचित जाती-जमाती अन् विशिष्ट जातींची होणार नोंद; पाहा 40 प्रश्नांत काय?

Raj Thackeray : पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडीवरून राज ठाकरे संतापले; म्हणाले- ज्यांना सत्ता दिली त्यांनाच जाब विचारा

Sangli Milk Collection Drop : FDA च्या धाडींमुळे सांगलीतील दुधाचा 'बनावट खेळ' बंद? तब्बल 78 हजार लिटरने दुधाची आवक घटली; पाहा आकडेवारी

Marathi News Live Updates : बीडच्या इमामपूरचंही नाव बदलणार? मंत्री भरत गोगावलेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Shivsena Express: कोकण प्रवास मोफत करता येणार, गणेशोत्सवासाठी मुंबईतून विशेष ट्रेन सुटणार; कुठून आणि कधी?

SCROLL FOR NEXT