Vaccination esakal
मुंबई

मुंबईसाठी लसी विकत घेण्याचा खर्च ३०० ते ७०० कोटी

जॉन्सन अँड जॉन्सनची लस मुंबईला मिळणार?

दीनानाथ परब

मुंबई: सध्या मुंबईत (BMC) लसींचा तुटवडा (vaccine shortage) जाणवत आहे. नागरिक लस केंद्रांवर येतात. पण विनालस त्यांना माघारी परतावे लागते. मुंबईत कुठलाही नागरिक लसीपासून वंचित राहू नये, त्यांचे लवकरात लवकर लसीकरण व्हावे, यासाठी मुंबई महापालिकेची लस खरेदीची योजना आहे. मुंबई महापालिका या लस खरेदीवर ३०० ते ७०० कोटी रुपये (vaccine spending) खर्च करणार आहे. लस खरेदीसाठी नेमकी किती रक्कम खर्च करायची, ते अद्याप निश्चित झालेले नाही. (BMC may spend Rs 300 crore to Rs 700 crore on vaccines)

स्वदेशी किंवा परदेशी कंपनी निविदा प्रक्रियेत कसा सहभाग घेते, त्यावर ते अवलंबून आहे. मुंबई महापालिकेला या दरम्यान ३०० ते ७०० कोटी रुपये खर्च येऊ शकतो. ही एक मुक्त EOI प्रक्रिया आहे. त्यात कोणीही सहभागी होऊ शकते. एकदा प्रस्ताव मिळाला की, आम्ही किंमतीची व्यवहार्यता तपासू व नंतर ऑर्डर देऊ असे अतिरिक्त महापालिका आयुक्त पी वेलरासू यांनी सांगितले.

लस खरेदीसाठी बीएमसी आपली एफडी मोडणार नाही. कर्मचाऱ्यांची पेन्शन, इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प अशा खास उद्देशांसाठी एफडी ठेवलेल्या आहेत, असे वेलरासू यांनी सांगितले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. BMC ने सिरम किंवा भारत बायोटेक या देशी कंपन्यांकडून लसी विकत घेतल्या, तर त्याची किंमत ३०० कोटी असेल. फायझर सारख्या कंपन्यांची लस विकत घेतली, तर ७०० कोटी खर्च असेल. फायझर, मॉर्डनाकडे आधीपासून ऑर्डर आहेत. जॉन्सन अँड जॉन्सन चौथ्या तिमाहीत लसींचा पुरवठा करु शकते, असे सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तीन वेळा डेडलाईन… तरीही योजना कागदावरच का? 'झिरो प्रिस्क्रिप्शन’चा अर्थसंकल्पात स्पष्ट उल्लेख नाही!

Google Search : फेब्रुवारी महिन्यात सगळ्यात जास्त बघण्यात आले 'हे' 5 व्हिडिओ, गुगल सर्च ट्रेंड डेटामुळे जगभर खळबळ

Mhada: रहिवाशांना गुडन्यूज! घरं रिकामी करण्यासाठी शिप्टींन चार्जेस देणार, आर्थिक मदतीसाठी म्हाडाचा मोठा निर्णय

EKA Mobility : इलेक्ट्रिक वाहन निर्मिती, स्त्रीसन्मान अन् तरुणांना रोजगार; EKA Mobility चा तिहेरी विजय! वाचा सविस्तर यशोगाथा

Latest Marathi News Live Update : रे रोड येथे हत्येचा प्रयत्न; क्रेन ऑपरेटरवर लोखंडी रॉडने हल्ला

SCROLL FOR NEXT