BMC sakal media
मुंबई

मुंबई : पालिकेत 'बंधूराज'; 21 कंपन्यांचे मालक भाऊ-भाऊ

समीर सुर्वे

मुंबई : महानगरपालिकेतील (BMC) कंत्राटदारांच्या सिंडीकेटची (contractor syndicate) नेहमीच चर्चा असतो. मात्र,पहिल्यांदाच शिवसेनेने (shivsena) या सिंडीकेटवर बोट ठेवले आहे. महानगरपालिकेत नोंद असलेल्या तब्बल 21 कंपन्यांची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मालकी (company owners) दोन भावांची (two brothers) आहे. पालिकेचे कोट्यावधीचे भंगार (Debris) ,जुन्या इमारतींचे पाडकामापासून अगदी वाहानतळांच्या कंत्राटातही (parking contract) याच बंधूचे राज चालते.

अग्निशमन दलाच्या 100 हून अधिक हलकी,अवजड वाहानांची दोन वर्षांपूर्वी विक्री झाली होती. या विक्रीतून पालिकेला 2 कोटी 14 रुपयांचे उत्पन्न मिळाले.मात्र,हा घोटाळा फक्त कमी किंमतीत भंगार विकले म्हणून मर्यादित नव्हते. मात्र,यात दोन भावांचे मोठे सिंडीकेट होते.भंगाराचा दर ठरविण्यापासून निवीदा मागविण्यापर्यंत आलेल्या कंपन्यांवर संशय स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी व्यक्त केला. निवीदा ठरविण्यापासून निवीदा प्रक्रियेत सहभागी झालेल्या कंपन्यांचे पत्ते आजूबाजूचेच आहेत. असा त्यांना आरोप आहे.

साकिनाका येथील या कंपन्यांची नोंदणी असल्याचा आरोप जाधव यांनी केला असून या बाबत त्यांनी आयुक्त इक्‍बाल सिंह चहल यांना पत्र पाठवून कारवाई करण्याची मागणी केली आहे.हा घोटाळा फक्त भंगारा पुरता मर्यादित नाही.तर,वाहानतळांचे कंत्राट घेण्या बरोबरच जुन्या इमारती पाडण्यातही या बंधूंचे राज आहे.असा आरोपही त्यांनी केला आहे. महानगर पालिका निवडणुक फेब्रुवारी 2022 मध्ये होणार आहे.या निवडणुकीत भाजप मुंबई महानगर पालिकेतील घोटाळ्यांवरुन शिवसेनेला अडचणीत आणणार आहे.

त्यातच आता शिवसेनेचे हा बंधूराज उघड केला आहे.त्यामुळे हा घोटाळा उकरुन शिवसेनेचा फायदा होणार का तोटा हे निवडणुकीतच ठरेल.मात्र,आमची बांधिलकी नागरीकांशी आहे.करदात्यांच्या पैशाचा वापर योग्य पध्दतीने व्हावा ही जबाबदारी मतदारांनीच सोचवली आहे.असे यशवंत जाधव यांनी नमुद केले. जुन्या इमारती पाडण्यासाठी प्रामुख्याने पाडकाम करणार कंत्राटदार खासगी विकसकांना पैसे देतो.

मात्र, महानगर पालिका कुलाबा येथील सफाई कामगारांच्या वसाहतीतील जुन्या इमारती पाडण्यासाठी कंत्राटदारला तब्बल 38 कोटी रुपये मोजणार आहे. हा प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीत मंजूर झाला.त्यावर भाजपचे भालचंद्र शिरसाट यांनी आक्षेप नोंदवला.मुळात अशा इमारती पाडण्यासाठी कंत्राटदार विकसकाला पैसे देतो.यातून मोठ्या प्रमाणात भंगार सामान मिळते.लोखंडे जुने लाकडी सामानाची किंमत जास्त असते.पण,पालिकेत उलटी गंगा वाहात आहे.असा आरोप शिरसाट यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT