मुंबई : कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्न करत आहे. यामध्येच लसीकरणाचं प्रमाणदेखील वाढविण्यात आलं आहे. विशेष म्हणजे आता कोविड सेंटर किंवा रुग्णालयांव्यतिरिक्त खासगी सोसायट्यांमध्येही लसीकरण (corona vaccination) केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. मुंबईत लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी आता खासगी सोसायट्यांमध्येही लसीकरण केंद्र सुरु करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. (bmc permitting housing societies to tie up with private hospitals to hold corona vaccination drives within theirpremises)
महापालिकेनं लसीचा साठा विचारात घेऊन खासगी रुग्णालयांना (hospitals) सोसायट्यांचा आवारात लसीकरण (corona vaccination) मोहिम सुरु करण्याची परवानगी दिली आहे. हौसिंग सोसायट्या, औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या, बँका आणि कॉर्पोरेट्स क्षेत्रातील कंपन्यांतील कर्मचाऱ्यांसाठी खासगी रुग्णांलयांशी संयुक्तपणे मोहीम राबवत खासगी लसीकरण केंद्र सुरु करु शकतात. महापालिकेनं आत्तापर्यंत 75 पेक्षा अधिक खासगी रुग्णालयांना सोसाट्यांमध्ये लसीकरण केंद्र उभारण्याची परवानगी दिली असून, यात अजून रुग्णालयांची भर पडणार आहे.
दरम्यान, मुंबईत आतापर्यंत 55 लाख 78 हजार, 236 कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90 टक्के आहे. कोरोना रुग्ण वाढीचा सरासरी दर 0.54 टक्के आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी कमी होऊन 123 दिवसांवर आला आहे. बुधवारी 3879 नवीन रुग्ण सापडले असून कोरोनाग्रस्तांचा एकूण संख्या 6,65,299 इतकी झाली आहे. रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा कमी होऊन 51,472 हजारांवर आला आहे. नव्या रुग्णांची संख्या स्थिरावल्याने रुग्णवाढीचा दर 0.54 पर्यंत खाली आला आहे. तर, बुधवारी मुंबईत दिवसभरात 77 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याने मृतांचा आकडा 13 हजार 547 वर पोहोचला आहे.
मुंबईत 102 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 728 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 22,341 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. आज कोविड काळजी केंद्र 1 मध्ये अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल 905 करण्यात आले.
धारावीतील 24 नवे रुग्ण
धारावीतील रुग्णसंख्यानियंत्रणात आली असून धारावीत आज 24 नवीन रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांची संख्या 6561 वर पोहोचली आहे. दादर मध्ये आज 37 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांची संख्या 9033 झाली आहे. माहीम मध्ये 46 रुग्ण सापडले असून एकूण रुग्ण 9168 इतके रुग्ण झाले आहेत.जी उत्तर मधील रुग्णसंख्या कमी झाली आहे. जी उत्तर मध्ये आज 107 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या 24,762 झाली आहे.
संपादन : शर्वरी जोशी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.