bmc sakal media
मुंबई

रस्ते दुरुस्तीसाठी अखेर फेरनिविदा; एक हजार १२६ कोटी रुपयांची कामे होणार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : रस्ते दुरुस्तीसाठी (road repairing) महापालिकेने (bmc) मागवलेल्या निविदांमध्ये (tender) कंत्राटदारांनी (contractor) ३० टक्के कमी दराने (less rate work) काम करण्याची तयारी दाखवल्याने जोरदार राजकारण सुरू झाले होते. अखेर महापालिकेने रस्ते दुरुस्तीसाठी फेरनिविदा मागवल्या आहेत. तब्बल एक हजार १२६ कोटी रुपयांच्या निविदा जाहीर करण्यात आल्या आहेत.

महापालिका प्रशासनाने रस्ते दुरुस्तीसाठी १२०० कोटी रुपयांच्या निविदा काही महिन्यांपूर्वी मागवल्या होत्या. त्यात कंत्राटदारांनी पालिकेच्या अंदाजित दरापेक्षा ३० टक्के कमी दराने काम करण्याची तयारी दाखवली होती. याबाबत भाजपने स्थायी समितीच्या बैठकीत आक्षेप घेतला, तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत प्रशासनाला पत्र लिहून कामाच्या दर्जाबाबत प्रश्‍न उपस्थित केला होता. अखेर महापालिका प्रशासनाने जुन्या निविदा रद्द करून नव्याने निविदा मागवल्या आहेत.

निवडणुकीचा मुहूर्त हुकणार

सदर कामाबाबतची निविदा प्रक्रिया महिन्याअखेरपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर निविदा स्वीकारणे, त्याची पडताळणी करणे, अंतिम निविदाकार ठरवून महापालिकेकडून मंजुरी घेण्यासाठी किमान दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी लागणार आहे, तर महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात होणार असून त्याची अचारसंहिता जानेवारी महिन्यापासून लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी रस्ते दुरुस्ती सुरू करण्याची सत्ताधाऱ्यांची इच्छा अपूर्ण राहणार आहे.

१५ ते १७ कंत्राटदारांची मक्तेदारी

महापालिकेने सुधारित निविदांमध्ये कंत्राटदारांकडे स्वमालकीचा डांबर आणि खडीचे मिश्रण तयार करण्याचा कारखाना असणे बंधनकारक आहे; मात्र असे कारखाने केवळ १५ ते १७ कंत्राटदारांकडे असून त्यांचीच निविदा प्रक्रियेत मक्तेदारी राहणार आहे.

डी.जे.कडे बैठक

यापूर्वीची निविदा प्रक्रिया रद्द होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. त्यानंतर महापालिकेतील नोंदणीकृत कंत्राटदारांची एका डी. जे. कडे बैठकही झाली होती. त्यामुळे डी.जे.चा (डिस्क जॉकी) रस्त्याच्या कंत्राटांशी काय संबंध, अशी चर्चा आता पालिका वर्तुळात सुरू आहे.

निविदांच्या विभागवार किमती

पश्‍चिम उपनगर - ६२० कोटी ५८ लाख
पूर्व उपनगर - ४०१ कोटी ९६ लाख
शहर - १०४ कोटी ८ लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CCMP BHMS Registration : सीसीएमपी-बीएचएमएस नोंदणीला राज्य सरकारचा हिरवा कंदील; आयएमएकडून राज्यव्यापी सेवा बंदची घोषणा

PMC Development : स्वच्छतागृहे दुरुस्तीऐवजी पाडण्यावर नगरसेवकांचा भर; ५५ प्रस्ताव नव्या बांधकामासाठी

Crime News : माहूरवरून परतणाऱ्या नवविवाहितांवर थरारक हल्ला; नववधूसह दोन लाखांची रोकड लंपास

Karad News : मतदारयादी सखोल पुनरिक्षणात कऱ्हाड दक्षिणची बाजी; पुणे विभागात प्रथम

पेट्रोल-डिझेल आणखी महागणार? केंद्र सरकारने विंडफॉल कराच्या दरात केली मोठी वाढ

SCROLL FOR NEXT