मुंबई

काय सांगता, मुंबईत यंदा 100 टक्‍क्‍यांहून अधिक नाले सफाई...

सकाळवृत्तसेवा

मुंबई : मुंबई महानगरपालिकेने यंदा नाल्यातून 100 टक्‍क्‍यांहून अधिक गाळ साफ केला आहे. यंदा पावसाळ्यापुर्वी 2 लाख 53 हजार मेट्रीक टन गाळ काढायचा होता.  मात्र महापालिकेने पावसाळ्यापुर्वी नाल्यातून 2 लाख 87 हजार मेट्रीक टनहून अधिक गाळ काढला आहे. त्याचसोबत शहरातील 169 पाणी तुंबणाऱ्या ठिकाणावरील पुर नियंत्रण कामं देखील कामे पुर्ण झाली आहेत.मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्‍बाल सिंह चहल यांनी शुक्रवारी मुंबईतील पावसाळी तयारीचा आढावा घेतला. त्यात, नाले सफाई बाबत माहिती देण्यात आली.

पावसाळ्यापुर्वी नाल्यांमधून 2 लाख 53 हजार मेट्रीक टन गाळ काढायचा होता. तर, प्रत्यक्षात 2 लाख 87 हजार मेट्रीक टन गाळ काढण्यात आला. मिठी नदीतून 98 हजार 578 मेट्रीक टन गाळ काढायचा होता प्रत्यक्षात 1 लाख 7 हजार मेट्रीक टन गाळ काढण्यात आला. म्हणजे नाल्यातून 113 टक्के आणि मिठी नदीतून 108 टक्के गाळ काढण्यात आल्याचा दावा पालिकेकडून केला जात आहे.

अशी झाली नाले सफाई 

  • मुंबई शहर - 21.97 किमी लांबीच्या नाल्यांमधून 25 हजार 498 मेट्रीक टन गाळ काढायचा होता. प्रत्यक्षात 30 हजार 350 मेट्रीक टन गाळ काढला. 119.03 टक्के नालेसफाई
  • पुर्व उपनगरं - 102.1 किलोमिटर नाल्यातून 85 हजार 438 मेट्रीक टन गाळ काढायचा होता. प्रत्यक्षात 1 लाख 23  मेट्रीक टन गाळ काढला. 117.07 टक्के नालेसफाई 
  • पश्चिम उपनगरं - 139.84 किमी लांबीच्या नाल्यांमधून 1 लाख 42 हजार 379 मेट्रीक टन गाळ काढायचा होता. प्रत्यक्षात 1 लाख 57 हजार 139  मेट्रीक टन गाळ काढण्यात आला. 110.37 टक्के नासेसफाई. 

मुंबईतील नाल्यांची सफाई तीन टप्प्यात होते. यात 70 टक्के गाळ हा पावसाळ्यापुर्वी काढला जातो. तर, पावसाळ्यात आणि इतर कालावधीत उर्वरीत गाळ सफाई केली जाते.

मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाज अशा प्रकारे 100 टक्‍क्‍याहून अधिक नाले सफाई झाली आहे. मुंबईत 263 किलोमिटरचे मोठे नाले आहे. 21 किलोमिटरच्या मिठी नदीचीही सफाई केली जाते. त्याचबरोबर पर्जन्यपेटिकांची सफाईही पावसाळ्या पुर्वी केली जाते.

महानगरपालिकेने 2017 पासून 2019 पर्यंतच्या पाणी तुंबणाऱ्या ठिकाणांचा अभ्यास करुन तेथे पुरनियंत्रण कामे हाती घेतली होती. यात, पर्जन्यवाहीन्यांची लांबी वाढवणे, पर्जन्यवाहीनीतील अडथळे दुर करणे अशी कामे करण्यात येते. संपुर्ण मुंबईतील 339 पाणी तुंबणाऱ्या ठिकाणी ही कामे करण्यात येत आहे. त्यातील 169 ठिकाणची कामे पुर्ण झाली आहेत. तर 70 ठिकाणची कामे अद्याप बाकी आहेत. 

BMC says they have done more than hundred percent nala safai this year

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhagyashree Patwardhan : अभिनेत्री भाग्यश्रीने आरती केली, विजयसिंहराजेंचा लेकीसोबतचा वाद पुन्हा उफाळला; राजवाड्याच्या दरबार हॉलमध्ये काय घडलं?

Pune News: महसूल विभागात खळबळ! जमिनींवर परस्पर कुळ लावल्याच्या तक्रारी; राज्यभरातील मंजूर प्रकरणांची तपासणी, महसूलमंत्र्यांनी काय दिले आदेश?

Shirdi Temple: साई चरणी १९ लाखांची सोन्याची छत्री, १ कोटी २० लाखांचा चांदीचा नंदी; गणेश चतुर्थीच्या दिवशी भाविकांकडून अर्पण

Latest Marathi News Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गणपती आगमन सोहळा मिरवणुकीला गालबोट, दोघांचा अपघाती मृत्यू

Maharashtra Weather : राज्यात विजांसह पावसाची शक्यता; पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाज

SCROLL FOR NEXT