मुंबई

कोरोना पॉझिटिव्ह डॉक्टरनंच केलं ऑपरेशन; आता या हलगर्जीपणाला काय बोलणार ?

सकाळवृत्तसेवा

मुंबईत - कोरोनाची भीती जगभरात आहे. अशात मुंबईत कोरोनाचा संसर्ग फैलावु नये म्हणून प्रशासनाकडून हरतऱ्हेची काळजी घेतली जातेय. जर तुम्ही परदेशातून आला असाल तर तुम्हाला १४ दिवस होम किंवा इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केलं जातंय. अशा संवेदनशील परिस्थितीत एका कोरोना पॉझिटिव्ह डॉक्टरने हलगर्जीपणा करणं किती मोठा घात करू शकतो हे वेगळं सांगायला नको.

असाच एक धक्कादायक प्रकार मुंबईत समोर आलाय. मुंबईतील सैफी रुग्णालयात हा अत्यंत गंभीर प्रकार घडलाय. या रुग्णालयात एक असा डॉक्टर होता जो कोरोना पॉझिटिव्ह  होता आणि धक्कादायक बाब म्हणजे या डॉक्टरने काही शस्त्रक्रिया देखील केल्यात. आता मुंबई महानगरपालिकेने याची गंभीर दखल घेतली असून हे हॉस्पिटल आता सील केलंय.

मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये ज्या वृद्ध डॉक्टरांचा मृत्यू झाला होता त्यांचाच हा मुलगा आहे. मुंबईतील सैफी रुग्णालयात ते सर्जन म्हणून कार्यरत आहेत. मधल्या काळात याच कोरोनाबाधित डॉक्टरांनी मुंबईतील सैफी हॉस्पिटलमधील रुग्णांवर उपचार केलेत, काही ऑपरेशन्स देखील केल्याची बाबा आता उघड झालीये. दरम्यान आता या डॉक्टरचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. त्यामुळे या डॉक्टरच्या संपर्कातील ४० जणांची आता चाचणी करण्यात येणार आहे. सर्वांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आलंय. यासर्वांना हाय रिस्क आणि लो रिस्क अशा दोन विभागात विभागलं गेलंय. 

सदर घटनेचं गांभीर्य पाहून मुंबई महानगरपालिकेने तात्काळ कारवाईचे आदेश दिलेत. याचसोबत ४० जणांपैकी ९ जणांना हॉस्टेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आलंय. आता हे हॉस्पिटल सील करून मुंबई महानगर पालिकेकडून या हॉस्पिटलच्या सॅनिटाझेशनचं काम आज करण्यात आलंय.

आता पुढील १४ दिवस सैफी हॉस्पिटलमधील OPD बंद ठेवावी आणि त्याबाबत नोटीस लावण्याचे आदेश मुंबई महानगर पालिकेकडून देण्यात आलेत. याचसोबत या रुग्णालयातील बाकी सर्व रुग्णांना इतर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये हलवण्यात यावं अशा सूचना देखील करण्यात आल्यात.   

BMC seals mumbai based saifi hospital after corona positive surgeon treats patients 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Latest Marathi News Live Update : प्रज्वल रेवण्णा प्रकरणी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची SIT सोबत बैठक

SCROLL FOR NEXT