BMC-Mumbai Esakal
मुंबई

BMC: सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर BMC चा दणका, मराठी पाट्यांसाठी ५००० दुकानांना नोटीस

दोन महिन्यांत मराठी पाट्या न लागल्यास कारवाई अटळ

सकाळ वृत्तसेवा

दुकानांवर मराठी पाट्या पुढील दोन महिन्यांत लावा, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने दुकानदारांची याचिका फेटाळल्यानंतर पालिका प्रशासनाने पुढील दोन महिने ‘वेट ॲण्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे, असे उपायुक्त (विशेष) संजोग कबरे यांनी स्पष्ट केले. दोन महिन्यांत अंमलबजावणी झाली नाही, तर कारवाई अटळ आहे, असा इशाराही त्यांनी दिला आहे. दुर्लक्ष करणाऱ्या ५,२१७ दुकानदारांना पालिका प्रशासनाने नोटिसा बजावल्या आहेत. (Latest Marathi News)

मराठी पाट्या दुकानांवर ठळक दिसतील अशा प्रकारे लावण्यात याव्यात, असे आदेश सरकारने दिले होते. मुंबई महापालिकेने मराठी पाट्या न लावणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली. मुंबईत २७ लाख दुकाने असून पालिकेच्या इशाऱ्यानंतर २३ हजार ४३६ दुकानदारांनी प्रवेशद्वारावर मराठी पाट्या झळकावल्या. (Marathi Tajya Batmya)

मराठी पाट्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या ५,२१७ दुकानदारांना पालिकेने १० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०२२ दरम्यान नोटीस पाठवली आहे.

दरम्यान, मराठी पाट्यांबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आभार मानले आहेत. एका ट्विटद्वारे त्यांनी मनसे कार्यकर्त्यांचेही अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis: फलटणला सर्वात आधुनिक शहर बनवू: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; टीकाटिप्पणीपेक्षा विकास हा माझा अजेंडा!

ख्रिसमस सेलिब्रेशनमध्ये गोड ट्विस्ट! 5 मिनिटांत घरच्या घरी बनवा विना अंड्याची Brownie, लगेच ट्राय करा

Marathi Career Rashi Bhavishya: आजचा दिवस भाग्यवान! सूर्य–मंगळ संयोगामुळे 'या' राशींना मिळणार करिअर आणि आर्थिक फायदा

अग्रलेख - सरकारी माणिकशोभा!

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचं 'Arrest Warrant' घेवून नाशिक पोलिस मुंबईतील लीलावती रूग्णालयात दाखल!

SCROLL FOR NEXT