मुंबई

मुंबईत 'या' रेस्टॉरंट अँड बारवर पालिकेची धाड, तब्बल २४५ जणांवर गुन्हा दाखल

पूजा विचारे

मुंबई:  मुंबई महापालिकेनं पुन्हा एकदा एका रेस्टॉरंट अँड बारवर धडक कारवाई केली आहे. ब्रिच कॅन्डी रुग्णालयाजवळील 'अर्बरझीन रेस्टॉरंट अँड बार' वर महापालिकेनं कारवाई  केल्याची माहिती मिळत आहे.

मुंबई महापालिकेच्या "डी" विभाग कार्यालयातर्फे काल रात्री एकच्या सुमारास या हॉटेलवर महापालिकेच्या पथकाने धाड टाकली. या धाडीत पालिकेनं २४५ लोकांवर गुन्हा नोंदवला आहे. 
 
पालिकेनं विना मास्क विषयक कारवाईसह सामाजिक अंतर न राखणे आणि सरकारच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा नोंदवलेला आहे. तसेच हे 'रेस्टॉरन्ट आणि बार' महापालिकेने बंद केलं आहे. तसेच रात्री २४५ लोकांवरती विना मास्क आढळल्यामुळे १९ हजार ४०० रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वीही जुहूतील पबवर मुंबई पालिकेनं कारवाईचा बडगा उगारला होता. अंधेरीच्या के वार्डानं ही कारवाई केली होती. या कारवाईत पालिका अधिकाऱ्यांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई केल्याचं समजलं होतं.

जुहूतील प्रसिद्ध क्लब R ADDA आणि पब 'बैरल मेंशन' यांच्यावर हा कारवाईचा बडगा उगारला.  मध्यरात्री २ वाजेपर्यंत पबमध्ये तरुणांची मोठ्या संख्येने गर्दी होती. अगोदरपासून पब आणि हॉटेल यांनी नियम पाळले नाही तर त्यांच्यावर कारवाई होत आहे. 

 Bombay Municipal Corporation taken action against Arborzine Restaurant and Bar bridge candy hospital

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT