mumbai sakal
मुंबई

BMC: शिवसेनेचं कार्यालय शिंदे गटानं घेतलं ताब्यात; महापालिकेत कार्यकर्ते भिडले

अखेर शेवटी अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांना पाचारणं करावं लागलं.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई महापालिकेतील शिवसेनेचं कार्यालय शिंदे गटानं बुधवारी (दि.२८) ताब्यात घेतंल. यामुळं ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पहायला मिळाले. यामुळं दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा संघर्ष झाला. यावेळी जोरदार घोषणाबाजाही करण्यात आली. अखेर अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांना पाचारण करावं लागलं. (BMC Thackeray group office taken over by Shinde group clashed between both side supportes)

यावेळी ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली. "४० खोके एकदम ओक्के", "आव्वाज कुणाचा? शिवसेनेचा", "उद्धव ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है" अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. बराच काळ हा गोंधळ सुरु राहिल्यानंतर अखेर पोलिसांनी दोन्ही गटांच्या नेत्यांना महापालिकेतून बाहेर काढलं.

शिंदे गटाचं म्हणणं काय?

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे म्हणाले, "शिवसेनेचं कार्यालय हे बाळासाहेबांच्या शिवसेनचं कार्यालयं आहे. मुंबई महापालिकेवर हक्क बाळासाहेबांच्या शिवसेनेचा अधिकार आहे. मुंबई बाळासाहेबांच्या शिवसेनेची असून त्यांच्या संकल्पेननंच आम्ही काम करतोय. कित्येक वर्षे आम्ही या कार्यालयातून काम केलं आहे. त्यामुळं याचं महत्व आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आम्ही इतर लोकांना भीक घालतं नाही, ज्यांना आरोप करायचा आहे त्यांनी करत रहावं. आम्ही मुंबईचा विकास करुन दाखवू"

हे ही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

ठाकरे गटाचं म्हणणं काय?

ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत म्हणाले, "घटनाबाह्य सरकार त्यानंतर बेकायदेशीर वागणं या सगळ्याचा महाराष्ट्राच्या जनतेनं गंभीर दखलं घेतली पाहिजे कारण यावर सरकार काही कारवाई करेल असं वाटत नाही. कारण यांना सगळ्याचं गोष्टी बेकायदा पाहिजे आहेत. कुठेही घुसायचं काहीही करायचं. यापूर्वी निवडणूक लढवायची म्हणून हे खोटं बोलले आणि त्यांनी आमचं नाव आणि चिन्ह गोठवून घेतलं. त्यामुळं आत्ताही त्यांनी घुसखोरीच केली आहे. त्यामुळं अधिवेशनात मुख्यमंत्र्यांना विचारा काय म्हणणं आहे. सुप्रिम कोर्टात केस सुरु असताना ही कोण माणसं आहेत जी दादागिरी करत आहेत. पालिका आयुक्तांनी यांच्यावर ताबडतोब अतिक्रमणाची केस दाकल करावी"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात घसरण; आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय आहे 24 कॅरेट सोन्याचा भाव?

Kolhapur Crime: 'कुरुंदवाडात धारदार शस्त्राने युवकावर सपासप वार'; एकमेकाकडे खुन्नसपणे बघण्याच्या रागातून झाला वाद

Trimbakeshwar : पहिने धबधब्याला पर्यटकांची गर्दी; नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर तुफान कोंडी

Latest Maharashtra News Updates : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

Nagpur Crime : निर्माल्य विसर्जनानंतर पतीसोबत काढला 'सेल्फी' अन् महिलेने नदीत मारली उडी; दोघांत असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT