मुंबई

मोठी बातमी - 120 कोरोना रुग्णांना दिलं 'हे' औषध त्यातले 108 झालेत बरे; जाणून घ्या कोणतं आहे 'हे' औषध

समीर सुर्वे

मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णसंख्या दररोज वाढतेय. अशात लवकरात लवकर कोरोनावर औषध येवो हीच प्रार्थना सर्वजण करतायत. अशात आता एक आशेचा किरण समोर येताना येताना दिसतोय. संधिवाताच्या उपचारासाठी वापरण्यात येणारे टॉसीलीझुमब हे औषध कोरोनाच्या रुग्णांसाठी प्रभावी ठरत आहे. महापालिकेने 120 रुग्णांना या औषधांचा डोस दिला होता त्यातील 108 रुग्ण बरे झाले आहेत. खुल्या बाजारात या औषधाची किंमत 60 हजार असून महापालिका 30 हजारात हे औषध खरेदी करत आहे.

एका प्रकारच्या संधिवाताच्या उपचारासाठी हे औषध वापरले जाते.हे औषध कोविडच्या विषाणूूूूवर काम करत नसले तरी रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते असे पालिकेच्या एका डॉक्टरने सांगितले.रुग्ण अत्यावस्थ होण्यापुर्वी अथवा त्याला व्हेटिलेटरची गरज लागण्या पुर्वी हे औषध रुग्णांना दिले जाते.मात्र,त्या पुर्वी त्यांच्या रक्ताच्या तसेच इतर चाचण्या कराव्या लागतात.त्यानुसार निर्णय घ्यावा लागत असल्याने प्रत्येक रुग्णाला हे औषध देता येत नाही.असेही सांगण्यात आले  राज्य सरकारने ही इतर ठिकाणच्या रुग्णांसाठी हे औषध वापरण्याची शिफारस केली आहे.

एका प्रकारच्या संधिवातात वापरण्यात येणारे हे औषध कोविडच्या रुग्णांना देण्यात येत आहे.त्याचे चांगले परीणामही दिसत आहेत.मात्र,रुग्णाला औषध देण्यापुर्वी त्याच्या काही चाचण्या कराव्या लागतात असे पालिकेच्या उप आरोग्य अधिकारी डॉ.दक्षा शहा यांनी सांगितले.

BMC tried tocilizumab medicine for covid 19 patients and observed outstanding results

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: सरकारकडून अपेक्षाच उरल्या नाहीत..., विद्यार्थ्यांना झालेली अमानुष मारहाणीवर राज ठाकरे चिडले

Student Protest: "आजच्या तरुणांना दडपणे अन् त्यांचे ब्रेनवॉश करणे, यशस्वी होणार नाही," भारतीय क्रिकेटपटूने सरकारला दाखवला आरसा

Latest Marathi News Live Update : CJP च्या शिष्टमंडळाची सरकारसोबतची बैठक संपली, नेमकी काय चर्चा झाली?

MHADA Sangli Housing : अवघ्या 15 लाखांत हक्काचं घर! 'म्हाडा'चा 354 कुटुंबीयांना निवारा, 'या' योजनेतून अनेकांची स्वप्नपूर्ती; सांगलीत घरांची बंपर लॉटरी

Ekadashi Horoscope : उद्या देवशयनी एकादशीला बनतोय दुर्मिळ योग! 'या' 5 राशीच्या लोकांची मोठी इच्छा होणार पूर्ण; धनलाभ ठरेल गेमचेंजर

SCROLL FOR NEXT