मुंबई

मुंबई जलमय होण्याचा धोका, पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्वात मोठी बातमी... 

सकाळवृत्तसेवा

मुंबई - कधीही मुसळधार पाऊस सुरू होण्याची शक्यता असल्याने पालिका सज्ज  झाली आहे. पावसाळयात पाणी तुंबणा-या ठिकाणच्या पाण्याचा उपसा करण्यासाठी यंदा  २९१ ठिकाणी ३५० पंप बसविण्यात येणार आहेत. कोरोना विरोधातील लढाईत संपूर्ण यंत्रणा गुंतली आहे. मनुष्यबळही कमी असल्याने पालिकेसमोर आव्हान आहे.

मुंबईत पाणी तुंबू नये यासाठी नालेसफाई, मॅनहोल, पर्जन्य जलवाहिन्यांची साफसफाई, पाणी तुंबण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांची अतिक्रमणे हटवण्याची कारवाई तसेच पंपिंग स्टेशनचा आढावा घेऊन दरवर्षी मे महिन्यात तयारी पूर्ण केली जाते. मात्र त्यानंतरही पावसात शहर आणि उपनगरातील विविध भागात पाणी तुंबते. त्यामुळे पालिकेवर टीकेची झोड उठत असल्याने पावसाळ्यात पालिका कामाला लागते.

यंदा मागील अडीच महिन्यांपासून मुंबईवर कोरोनाचे संकट आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा गुंतली आहे. तसेच कोरोनामुळे मनुष्यबळही कमी असल्याने  यंदाच्या पावसाळ्यात प्रशासनाची कसोटी लागणार आहे. 

पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर कोरोनासोबतच पावसाळापूर्व कामांचा आढावा नुकताच घेतला. या बैठकीत पर्जन्य जलवाहिन्या विभाग, मलनि:सारण विभाग, विद्युत आणि देखभाल विभागासह संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेने कामाला लागण्याचे आदेश दिले आहे. गेल्या वर्षी पाणी तुंबलेल्या ठिकाणी यंदा पाणी तुंबू नये, यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात असे संबंधित अधिका-यांना सांगण्यात आले आहे.  

गेल्या आठवड्यात निसर्ग चक्रीवादळामुळे पडलेल्या पहिल्याच पावसात मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचले होते. येत्या एक दोन दिवसांत मुंबईत मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर पाणी तुंबणा-या ठिकाणावर उपाययोजनेसाठी पालिकेची यंत्रणा सज्ज झाली असल्याचे सांगण्यात आले.

BMC has installed 350 pumps on more than 290 places in mumbai
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुण्यात एकाच वेळी दोघांनी संपवले जीवन, तरुण-तरुणीचे मृतदेह सापडले, घटनेने खळबळ

Latest Marathi News Updates : विजेचा धक्का लागून शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू

Mumbai Politics: पलावात आमदारांनी घर घ्यावे, म्हणजे उठलं की जाता येईल, ठाकरे गटाचा शिंदेसेनेच्या आमदारांना टोला

"माझ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध" पंचायत फेम अभिनेत्यावर पत्नीने केलेले गंभीर आरोप

Demat Account: शेअर बाजाराची क्रेझ कमी होत आहे का? डीमॅट अकाउंट बंद करण्याचे प्रमाण वाढले, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT