hearse 
मुंबई

बापरे! शववाहीनीचे दोन महिन्याचे भाडे तब्बल 'इतके' लाख रुपये; वाचा सविस्तर बातमी.

समीर सुर्वे

.मुंबई: मुंबई महानगर पालिका कोविड बाधित मृतदेह स्मशानभूमी अथवा दफन भुमीपर्यंत नेण्यासाठी 39 शववाहीन्या भाड्याने घेणार आहे. या प्रत्येक शववाहीन्यांच्या 2 महिन्यांच्या भाड्यासाठी पालिका साधारण 10 ते 13 लाख रुपये मोजणार आहे.

महापालिकेने 39 शववाहीन्या भाड्याने घेण्यासाठी निवीदा मागवल्या आहेत. यासाठी सुमारे 4 कोटी रुपये खर्च अंदाजित केला आहे.प्रत्येक वाहीनी सोबत 4 कामगार पुरविणेही बंधनकारक आहे.

प्रत्येक प्रभागात एक आणि 15 शववाहीन्या रुग्णालयात ठेवण्यात येणार आहेत. मृतदेह नेण्यासाठी आता पर्यंत नातेवाईकांना रुग्णवाहीका वापराव्या लागत होत्या. मात्र,लवकरच शववाहीन्या उपलब्ध होणार आहेत.

या शववाहीन्यांसोबत महापालिका 70 रुग्णवाहीकाही तीन महिन्यांसाठी भाड्याने घेणार आहे. या प्रत्येक रुग्णवाहीकेसाठी 3 लाखाहून अधिक खर्च होणार आहे. सध्या पालिकेकडे 90 रुग्णवाहीका आहेत. तर 200 बेस्ट बसचे रुपांतरही रुग्णवाहीकेत करण्यात आले आहे.

मृतदेह वाहून नेण्यासाठी आता पर्यंत रुग्णवाहीकांचा वापर केला जात होता. अनेक वेळा  मृताच्या नातेवाईकांना हजाााारो रुपयांचाही खर्च करावा लागत होता. त्याच बरोबर काही भागातील स्मशानभूमी मध्ये गर्दी असल्याने रुग्णवाहीकांचाही खोळंबा होत होता.

संपादन: अथर्व महांकाळ

bmc will pay 10 lac for 2 months rent of hearse  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaysingpur Heavy Rain : जयसिंगपुरात ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार; घरांमध्ये पाणी, कोल्हापूर-सांगली महामार्गावर फूटभर पाणी

Manchar News : वादळी वाऱ्यामुळे केळी, मका व आंबा पिकांचे मोठे नुकसान; प्रशासनाला पंचनामे करण्याच्या दिलीप वळसे पाटील यांच्या सूचना

MP Supriya Sule : ‘नरेटिव्ह’ पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई का नाही?

अमरावतीत ट्विस्ट! महायुतीत बंडखोरी करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला, आता रिंगणात चार उमेदवार, नेमकं काय घडतंय?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाकडे शासनाचे दुर्लक्ष; स्मारकासाठी मंजूर केलेला दोन कोटींचा निधी गेला कुठं?

SCROLL FOR NEXT