मुंबई

कंगनाच्या घरावरील कारवाईवर पालिका ६ आठवड्यानंतर घेणार निर्णय

समीर सुर्वे

मुंबई: अभिनेत्री कंगना राणावतच्या खार येथील घरातील बेकायदा बांधकामाला महानगर पालिकेने पाठवलेल्या नोटीसवर स्थगिती देण्यास दिंडोशी महानगर दंडाधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. मात्र, या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी 6 आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे महानगर पालिकेने सहा आठवड्यानंतर कारवाईबाबत दिशा ठरविण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिकेने वर्षभरापूर्वी महापालिकेच्या एच पश्‍चिम प्रभाग कार्यालयाने खार येथील डी.बी.ब्रीझ या इमारतीतील घरांमध्ये बेकायदा बांधकाम केल्याबद्दल कंगनासह इमारतीमधील इतर रहिवाशांना नोटीस पाठवली होती. या नोटीसला कंगनाच्या वतीने दिंडोशी महानगर दंडाधिकाऱ्यांकडे आव्हान देण्यात आले होते. त्यावर बुधवारी महानगर दंडाधिकारी यांनी पालिकेच्या कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिला. मात्र यासाठी उच्च न्यायालयाद दाद मागण्यासाठी सहा आठवड्यांची मुदत दिली आहे. त्यामुळे महानगर पालिकेलाही तत्काळ कारवाई करता येणार नाही. सहा आठवडे उलटल्यानंतर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात येईल असे पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी विनायक विसपुते यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही. कंगनाने संक एरिया, डक्ट, कॉमन पॅसेज यात काही बदल केले आहे, असा दावा पालिकेच्या नोटीसमध्ये करण्यात आला आहे.

------------------------

(संपादन- पूजा विचारे)

bmc will take decision on action against Kangana Ranavat house after 6 weeks

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara IT Park : कोल्हापूर-साताऱ्यात आयटी पार्कचा मार्ग मोकळा, म्हसवड MIDC साठीही तब्बल 500 कोटी; मंत्री उदय सामंत यांचा मोठा निर्णय

Satara District bank Election : सातारा जिल्हा बॅंक निवडणुकीबाबत मंत्री जयकुमार गोरेंच्या वक्तव्यावर मंत्री उदय सामंत यांचा सावध पवित्रा

Uday Samant : यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने राज्यात स्वतंत्र अनुवाद समिती स्थापन करणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा

वरिष्ठ IAS अधिकारी बेपत्ता, मोबाईही बंद; शेवटचं लोकेशन बंगळुरु विमानतळावर

Nagpur News : नऊ दिवसांपासून नवजात बालिकेच्या शोधात फिरत होती महिला; मुलगी मेल्याने होती अस्वस्थ, रिक्षामधून उडी मारण्याचाही प्रयत्न

SCROLL FOR NEXT