मुंबई

गटारात वाहून गेलेल्या लहानग्याचा मृतदेह सापडला खाडीकिनारी; आकस्मिक मृत्यूची नोंद

विक्रम गायकवाड

नवी मुंबई : दोन दिवसांपूर्वी अनिकेत दिलीपराव सिंग हा 7 वर्षीय मुलगा मुसळधार पावसामुळे गटारात पडून वाहून गेला होता. त्याचा शोध सुरू असतानाच रविवारी सायंकाळी नेरूळच्या सारसोळे येथील खाडीकिनारी त्याचा मृतदेह आढळून आला.  

अनिकेत सिंग हा शिरवणे भागात राहण्यास असून, तो 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास दूध आणण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. त्याच वेळी मुसळधार पाऊस सुरू झाला होता. मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे त्याला गटाराचा अंदाज न आल्याने तो त्यात पडला होता. नागरिकांनी त्याला तत्काळ गटारात शोधण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र, पावसाचा जोर जास्त असल्याने आणि सगळीकडे पाणी साचल्याने अनिकेत गटारातील पाण्यातून वाहून गेला. 

तासाभरानंतर पाऊस जोर कमी होताच त्याच्या पालकांनी आणि परिसरातील नागरिकांनी गटारातून वाहून गेलेल्या अनिकेतचा पुन्हा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या वेळीही त्याचा शोध लागला नव्हता. दोन दिवसांपासून त्याचे पालक व नातेवाईक त्याचा शोध सगळीकडे घेत होते. अखेर रविवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास अनिकेतचा मृतदेह सारसोळे येथील खाडीकिनारी मच्छीमारांना आढळून आला. नेरूळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याचा मृतदेह ताब्यात घेतला. त्याचा मृतदेह सापडताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी नेरूळ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  

--------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Belagaum House Fire : बेळगाव हादरले! गणेशोत्सवाच्या रात्री काळाचा घाला; घरातील आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

Mumbai-Konkan Ro-Ro Service : कोकणवासियांसाठी खूशखबर! मुंबई ते वेंगुर्ला रो-रो सेवा पुन्हा सुरू होणार, प्रवासाचा वेळ वाचणार, तिकीट दरही आवाक्यात?

India Nepal Power Supply : भारत नेपाळला दररोज १८ तास वीज पुरवणार, जलप्रलयानंतर मदतीचा हात

Latest Marathi News Update : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव, संजय राऊत काय म्हणाले

Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ! हैदराबादमध्ये पेट्रोल 116 रुपयांवर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल-CNG किती?

SCROLL FOR NEXT