Body of a 7 year old girl was found Body of a 7 year old girl was found
मुंबई

७ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला तर आई बेशुद्ध

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मीरा रोड येथील सीझन्स हॉटेलमध्ये सात वर्षीय मुलीचा मृतदेह (Body found) आढळला. तसेच आई दुसऱ्या खोलीत बेशुद्धावस्थेत सापडली. मात्र, वडील बेपत्ता होते. ही घटना सोमवारी उघडकीस आली. या प्रकरणी विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. (Body of a 7 year old girl was found)

प्राप्त माहितीनुसार, पती-पत्नी हे मुलीसह मीरा रोड येथील सीझन्स हॉटेलमध्ये थांबले होते. मात्र, कोणताही प्रतिसाद येत नसल्याने एकाने त्यांच्या खोलीत जाऊन बघितले. यावेळी सात वर्षीय मुलीचा मृतदेह (Body found) आढळला. दुसऱ्या खोलीत जाऊन बघितले असता आई बेशुद्धावस्थेत आढळली. मात्र, मुलीचे वडील हॉटेलमध्ये आढळले नाही.

यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने कुटुंबाने आत्महत्येचा (Attempt To Suicide) विचार केला असावा, असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. पतीने पत्नी आणि मुलीला विष दिले आणि स्वतः आत्महत्या करण्यासाठी निघून गेला असावा, असे काशिमीरा पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAG Report : रेल्वे स्थानकातील पाणी पिता? CSMT, कल्याण, लोणावळ्यातही तपासणी; कॅगच्या अहवालात धक्कादायक खुलासा

Panvel-Karjat Local: आनंदाची बातमी! दीड तासाचा प्रवास ४० मिनिटांत पूर्ण; कर्जत-पनवेल लोकल कधी सुरु होणार? तारीख आली समोर

Gold Rate Today: सोनं खरेदीचा विचार करताय? दरात रातोरात मोठा बदल; मुंबई-पुण्यात 10 ग्रॅमचा भाव कुठे पोहोचला?

Marathi News Live Updates : महाडमध्ये केमिकल कंपनीत गॅस गळतीमुळे एकाचा मृत्यू, ८ गंभीर

MahaDBT Scheme: २९ नव्या योजना महाडीबीटीवर, घरबसल्या १०५ शासकीय योजनांचे लाभ मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT