मुंबई

महामार्गावरील बस थांब्यावर लटकलेला मृतदेह 

सकाळ वृत्तसेवा

नालासोपारा : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर विरारच्या हद्दीत सकवार येथे एका 35 ते 40 वर्षीय इसमाचा बस थांब्याच्या लोखंडी गजाला गळफास असलेला मृतदेह आढळला आहे. मंगळवारी (ता. 17) सकाळी 8 वाजता ही घटना उघड झाली असून विरार पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

सध्या याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करून ही हत्या आहे की आत्महत्या, याचा शोध सुरू करण्यात आला आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर विरारच्या हद्दीत सकवार हे गाव आहे. गावच्या बस थांब्याच्या लोखंडी पाईपला नायलॉनची दोरी गळ्याला बांधून हा मृतदेह लटकवण्यात आला होता.

मंगळवारी सकाळी 8 च्या सुमारास गावच्या स्थानिकांना मृतदेह दिसल्यानंतर त्यांनी तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. अद्याप मृतदेहाची कोणतीही ओळख पटली नसल्याने अकस्मात मृत्यूची नोंद विरार पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. गळफास घेतला असतानाही मृतदेह जमिनीला चिकटला असल्याने ही हत्या की आत्महत्या, याचा शोध विरार पोलिस करीत आहेत. 

web title : The body was found hanging on a bus stop on the highway

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mani Shankar Aiyar : ‘’मी गांधीवादी, नेहरूवादी, राजीववादी आहे, पण राहुलवादी नाही’’ ; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर थेटच बोलले..!

Pune Shivjayanti : रस्त्याच्या कामामुळे शिवजयंती मिरवणूक मार्गात बदल; महापौरांचे आदेश

भिवडी येथे कारखान्यात भीषण स्फोट; सात ठार, बेकायदा फटाके निर्मिती सुरू असल्याचा दावा

Pune Crime : पोलिसांकडून आंतरराज्यीय टोळी उद्ध्वस्त, सव्वाचार कोटींचे मेफेड्रोन जप्त

Latest Marathi News Update : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT