मुंबई

Aupan Kher : प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांच्या कार्यालयात झाली चोरी, 4.15 लाखांचा मुद्देमाल फस्त

Anupam Kher office robbed : वीरा देसाई रोड येथील कार्यालयात ही चोरी झाली आहे. अंबोली पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chinmay Jagtap

Mumbai crime news बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांच्या अंधेरी येथील कार्यालयावर बुधवारी रात्री चारी झाली. यावेळी अकाउंट डिपार्टमेंटमधील पूर्ण सेल्फ चोरट्यांनी चोरुन नेला. (theft at bollywood actor office)

ज्येष्ठ अभिनेते, निर्माते अनुपम खेर यांच्या अंधेरी, वीरा देसाई मार्ग येथील कार्यालयात बुधवारी रात्री चोरी झाली. चोरांनी या कार्यालयातील तिजोरी आणि खेर यांच्या कंपनीने निर्मित केलेल्या एका चित्रपटाची निगेटिव्ह पळवली. याप्रकरणी अंबोली पोलिसांनी ठाण्यात घरफोडीचा गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.

दरवाजा तोडून आत शिरलेल्या चोरांनी तिजोरी उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र ते शक्य न झाल्याने त्यांनी तिजोरीच सोबत नेली. तिजोरीसह बाहेर पडणारे चोर सीसीटिव्हीत कैद झाले असून हे चित्रण आपल्या कार्यालयाने पोलिसांना सुपूर्द केले आहे. ईश्वर या चोरांना सद्बुद्धी देओ, असे खेर यांनी आपल्या पोस्ट मध्ये नमूद केले आहे. (bollywood actor Anupam kher)

अंबोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खेर यांच्या कार्यालयातून चोरी झालेल्या तिजोरीत सुमारे चार लाख रुपयांची रोकड होती. तर चित्रपटाची निगेटिव्ह एका खोक्यात होती. सीसीटीव्ही चित्रणात चोर हे समान घेऊन एका रिक्षात बसताना दिसत आहेत.( Anupam Kher Andheri office )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT