Anupam Kher : मोदींसाठी अनुपम यांची खास कविता, "ईमानदार व्यक्ति को बहुत..."

Anupam Kher poem on Modiji after winning election: अभिनेते अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर मोदींसाठी खास कविता शेअर केलीये.
Anupam Kher
Anupam KherEsakal

Anupam Kher poem on Modiji : बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर हे मोदींचे सगळ्यात मोठे प्रशंसक म्हणूनही ओळखले जातात. सोशल मीडियावर ते कायमच मोदींसाठी कायमच काही ना काही पोस्ट शेअर करत असतात.

लोकसभा निवडणुकीतील भाजपाच्या हॅटट्रिक विजयानंतर अनुपम खेर यांनी शेअर केलेली ही कविता सोशल मीडियावर शेअर करण्यात आली.

अनुपम खेर यांची कविता

"कभी कभी सोचता हूँ कि

(कधी कधी विचार करतो कि)

ईमानदार व्यक्ति को बहुत

(इमानदार व्यक्तीला खूप)

ज्यादा ईमानदार नहीं होना

(जास्त इमानदार नाही झालं पाहिजे)

चाहिए।

जंगल में सीधे तने वाले पेड़ ही

(जंगलात सरळ असणारी झाडच)

सबसे पहले काटें जाते है।

(सगळ्यात आधी तोडली जातात)

बहुत ज्यादा ईमानदार व्यक्ति

(सगळ्यात जास्त इमानदार व्यक्तीला)

को ही सबसे ज्यादा कष्ट उठाने

पड़ते है।

(सगळ्यात जास्त कष्ट करावे लागतात)

पर फिर भी वह अपने ईमानदारी

नहीं छोड़ता।।

(पण तरीही तो त्याची इमानदारी सोडत नाही)

इसीलिए करोड़ों लोगों के लिए

प्रेरणा का स्त्रोत बनता है।

(म्हणूनच ते करोडो लोगांसाठी प्रेरणेचा स्रोत बनतात)

जय हो। " ही कविता अनुपम यांनी सोशल मीडियावर शेअर केला जातो.

सोशल मीडियावर प्रतिक्रिया

अनुपम यांची ही कविता अनेकांना आवडली आहे. अनेकांनी कमेंट्स करत अनुपम यांच्या कवितेचं कौतुक केलं आहे. अनेकांना त्यांची ही कविता आवडली असून अनेकांनी मोदी शहा यांनी घेतलेल्या या मेहनतीचं कौतुक केलं आहे.

अयोध्येचा पराभव जिव्हारी

अयोध्येचा पराभव भाजपा पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांच्या जिव्हारी लागल्याचं म्हंटलं जातंय आणि म्हणूनच ही पोस्ट अनुपम यांनी केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अनेकांनी याबाबत सोशल मीडियावर कमेंट करत अयोध्यावासियांबाबतची नाराजीही व्यक्त केली.

Anupam Kher
Anupam Kher Birthday : लोकांना सतत हसरं ठेवणाऱ्या अनुपम यांना करावा लागला नैराश्याचा सामना! कशी घेतली भरारी?

सोनू निगमनेही सुनावले खडेबोल

गायक सोनू निगमनेही भाजपाची अयोध्येत हार झाल्यानंतर अयोध्यावासियांवर नाराजी सोशल मीडियावर व्यक्त केली. "ज्या सरकारने संपूर्ण अयोध्याला बदलून दिले. विकासाची गंगा त्या ठिकाणी आणली. अयोध्येला चमकवले. नवीन विमानतळ दिले. जागतिक दर्जाचे रेल्वे स्टेशन दिले. इकोनॉमी झोन बनवले. त्या ठिकाणी भाजपचा उमेदवाराचा पराभव झाला. हे लज्जास्पद आहे." असं ट्विट सोनुने सोशल मीडियावर केलं होतं.

Anupam Kher
Anupam Kher: अनुपम खेर यांनी वाढदिवशी चाहत्यांना दिलं सरप्राईज; आगामी चित्रपटाची केली घोषणा, सिनेमाचं नाव माहितीये?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com