मुंबई

आज अर्जुन रामपालची एनसीबीकडून पुन्हा होणार चौकशी

अनिश पाटील

मुंबईः  बॉलिवूड अंमली पदार्थ साखळीप्रकरणी तपास करणा-या केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने(एनसीबी) अभिनेता अर्जुन रामपालला चौकशीसाठी पुन्हा समन्स पाठवला आहे. यापूर्वी रामपाल आणि त्याची प्रेयसी गॅब्रिएला डेमेट्रियड्स यांची एनसीबीचे चौकशी केली होती. ड्रग्स वितरण साखळीप्रकरणी ही चौकशी करण्यात येणार आहे. आज अर्जुन रामपालला चौकशीसाठी एनसीबीच्या ऑफिसमध्ये हजर राहावं लागणार आहे.

याप्रकरणी तपासात काही नवे पुरावे एनसीबीच्या हाती लागले आहेत. त्याची पडताळणी करण्यासाठी रामपालची पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे. रामपाल चौकशीसाठी आज येण्याची शक्यता आहे.

रामपालने यापूर्वी झालेल्या चौकशीवेळी ड्रग्स प्रकरणी आपला काहीही संबध नसल्याचे त्याने सांगितले. आपल्याला या ड्रग्सबद्दल काही माहिती नसल्याचे  सांगितले होते अर्जुन रामपाल याची प्रेयसी गॅब्रिएला डेमेट्रियड्स हिची एनसीबीने दोनवेळा चौकशी केली आहे. त्यापूर्वी अर्जुन रामपालच्या घरावर एनसीबी पथकाने छापा टाकला होता. त्यावेळी एनसीबीने अर्जुनच्या घरातून त्याचा लॅपटॉप, मोबाईल फोन आणि टॅब जप्त केला होता.  त्यात प्रतिबंधीत गोळ्या सापडल्या होत्या. पण डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि चिठ्ठीने आपण या गोळ्या घेत असल्याचे त्याने सांगितले.

अर्जुन रामपालची प्रेयसी गॅब्रिएला डेमेट्रियड्स हिचा भाऊ अॅजिसिलाऊस डेमेट्रीअॅडेट्सला  एनसीबीने अटक केली होती. लोणावळा येथे डेमेट्रीअॅडेट्स राहत असलेल्या घरावर छापा टाकला. तेथे तो त्याच्या प्रेयसीसोबत राहत होता. त्याच्याकडून 0.8 ग्रॅम चरस जप्त करण्यात आले आहे. त्यानंतर डेमेट्रीअॅडेट्सला खार येथील घराचीही झडती घेण्यात आली. तेथे अलफ्रॅझोलन गोळ्यांची एक स्ट्रीप सापडली होती.याशिवाय अर्जुन रामपालचा मित्र पॉल बार्टेलला एनसीबीने अटक केली होती. पॉल हा ऑस्ट्रेलियन असून, तो एका मोठ्या बांधकाम कंपनीत काम करतो. तो वास्तू विशारद आहे.

-------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

bollywood actor Arjun Rampal questioned again Narcotics Control Bureau today

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT