मुंबई

Sonu Sood : अभिनेता सोनू सूद ने एका माणसाला पायलट बनण्यास कशी मदत केली ?

Sonu Sood : " सोनू सूद ने घडवला एक तरुण पायलट "

सकाळ डिजिटल टीम

Sonu Sood : बॉलीवूडचा मसिहा सोनू सूद नेहमीच त्याच्या परोपकारी प्रयत्नांसाठी आणि वास्तविक जीवनातील नायक म्हणून ओळखला जातो. वैमानिक होण्याचे त्याचे स्वप्न साकार करून त्याने एका माणसाचे जीवन कसे बदलून टाकले ही गोष्ट बघुया ! एक मुलगा जो एव्हिएशन अकादमीमध्ये पायलट म्हणून ग्राउंड इन्स्ट्रक्टर म्हणून काम करत आहे आणि हे फक्त सोनू सूदच्या प्रयत्ना मुळे शक्य झालं.

गरिबीत जन्मलेल्या या व्यक्तीने अनेक संकटांना तोंड दिले आणि अशा पार्श्वभूमीतून उदयास आला जिथे पायलट बनण्याची कल्पना अशक्य वाटत होती. तो म्हणतो " मला खूप संघर्षांचा सामना करावा लागला, जसे की पुरेसे आर्थिक पाठबळ न मिळणे."

एअरलाइनमध्ये मदतनीस आणि क्लिनर म्हणून प्रवास सुरू केल्यानंतर, त्याला एक अनपेक्षित सहकारी मिळाला आणि तो म्हणजे अभिनेता सोनू सूद. "सोनू सूदने मला मदत केली आणि सोनू सूदच्या प्रेरणेने फाऊंडेशनकडून विनंती केल्यानंतर मला लगेच आर्थिक मदत मिळाली" हा एक टर्निंग पॉईंट होता ज्याने त्याच्या महत्वाकांक्षा पुन्हा जागृत केल्या आणि त्याच्या आकांक्षांना पंख दिले.

" माझे स्वप्न सोनू सूदला विमातून उडवण्याचे आहे आणि मी त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहे. आता मी YouTube चॅनेलद्वारे मुलाखत घेत आहे, आणि सोनू सूदने स्वतः मला सांगितले की त्याला माझा अभिमान आहे. ते एक वाक्य माझ्यासाठी आयुष्यभराची उपलब्धी आहे. त्याचे प्रोत्साहन केवळ माझेच नाही तर अनेकांचे जीवन बदलून टाकले आहे. माझा YouTube व्हिडिओ पाहिल्यानंतर, लोकांनी माझ्यासारखे वैमानिक व्हायचे आहे, असे सांगून माझ्यापर्यंत पोहोचले आहे. हा विश्वास, कमी विशेषाधिकार असलेले देखील पायलट होऊ शकतात. असंख्य लोकांच्या मनात घर केले आहे, सर्व धन्यवाद सोनू सूदला."

या पायलटची कहाणी आशेचा किरण आहे. सोनू ने आजवर अनेकांना मदत करून त्यांच्या जीवनात एक नवा बदल घडवून आणला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED action on Sahara Group : सहारा ग्रुपवर 'ED'ची मोठी कारवाई; कोट्यवधींच्या घोटाळ्यात आरोपपत्र दाखल

Ganpati Visarjan 2025 Live Updates : 1935 पासून हरिनामाच्या गजरात निघते सार्वजनिक गणपतीची बैलगाडीतून मिरवणूक

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवात 'चिकमोत्याची माळ' गाण्यावर थिरकली तरुणाई; सोशल मीडियावर रील्सना प्रचंड प्रतिसाद

Viral Video: भक्तीची ताकद की गणरायाचा चमत्कार? पाण्याचा मोठा प्रवाह, तरीही विसर्जनावेळी मूर्ती वाहून गेलीच नाही, पाहा व्हिडिओ

अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला मराठी कलाकारांनी घेतले शामनगरच्या राजाचे दर्शन

SCROLL FOR NEXT