Kirit Somaiya Neil Somaiya esakal
मुंबई

INS विक्रांत प्रकरणी सोमय्या पिता-पुत्रांना मुंबई HC चा मोठा दिलासा

या प्रकरणी संजय राऊत यांनी घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या (Neil Somaiya) यांना मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) मोठा दिलासा दिला आहे. INS विक्रांत निधी घोटाळा प्रकरणी 14 जूनपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन वाढवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घोटाळा झाल्याचा आरोप राऊतांनी केला असून, सोमय्या पितापुत्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लढाऊ जहाज INS विक्रांतच्या डागडुजीसाठी अभियान सुरू केले होते. या अभियानातून जमा केलेले कोट्यावधी रुपये राज्यपाल यांना देणार असल्याचे सांगितले होते. मात्र, ते पैसे राज्यापालांना न देता आर्थिक सहाय्यता अपहार केला, असा आरोप सोमय्या पिता-पुत्रांवर आहे. (INS Vikrant Fraud Case)

संजय राऊतांचे आरोप काय? -

किरीट सोमय्या यांनी INS विक्रांतसाठी जमा केलेला निधी राज्यपालांकडे सुपूर्द केला नाही. आम्ही राज्यपाल कार्यालयाकडून माहिती मागवली होती. पण, त्यात हा निधी जमा झाला नाही, असं राज्यपाल कार्यालयाकडून सांगितलं. सोमय्यांनी मुंबईतील अनेक ठिकाणांहून निधी गोळा केला होता. जवळपास ५७ ते ५८ कोटी रुपयांचा निधी जमा झाला होता. यामध्ये इतर भाजप नेत्यांचा देखील समावेश आहे. पण, किरीट सोमय्या हे मुख्य सूत्रधार आहेत. यामध्ये कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाला आहे, असे गंभीर आरोप संजय राऊतांनी केले.

नेमकं काय प्रकरण? -

INS विक्रांत या युद्धनौकेन भारत-पाकिस्तान युद्धात मोठी भूमिका बजावली होती. या आयएएनस विक्रांतची देखभाल करण्यास सरकारने असमर्थता दर्शविली होती. त्यानंतर त्याचा लिलाव न करता त्याचे संग्रहालयात रुपांतर करावे, अशी मागणी झाली होती. INS विक्रांतला वाचविण्यासाठी सोमय्यांनी सामान्य नागरिकांकडून निधी गोळा केला होता. पण, हा निधी राज्यपाल कार्यालयात पोहोचलाच नाही. त्यामुळे आता सोमय्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT