मुंबई

रक्तबंबाळ अवस्थेतही पोलिसांनी आरोपींचा पाठलाग केला आणि मुसक्या आवळल्या

अनिश पाटील

मुंबई : देवनार परिसरात सराईत आरोपींवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिस शिपायाच्या डोक्यात आरोपीने बिअरची बाटली फोडल्याची गंभीर प्रकार घडला आहे. या घटनेत पन्नास वर्षीय पोलिस शिपाई विनोद म्हात्रे हे गंभीर जखमी झाले होते. मात्र रक्तबंबाळ अवस्थेत त्यांनी आरोपींचा पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळल्या, या प्रकरणातील इतर दोन आरोपींचा पोलिस शोध घेत आहे.

देवनारच्या लाईफ लाइन हाँस्पिटल, गोवंडी येथे पोलिस शिपाई विनोद म्हात्रे हा रात्री सायकलने पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी मागून आलेल्या दुचाकीहून तीन जण रात्रीच्या वेळेस भरधाव दुचाकी चालवून हातात नग्या तलवारी रस्त्यावर घेऊन टवाळखोरी करत होते. याची माहिती विनोद यांनी देवनार पोलिस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना देत सायकलने त्याचा पाठलाग सुरू केला. काही अंतरावर देवनार पशु केंद्राच्या गल्लीत हे तीन आरोपी अंधारात उभे होते. त्यांच्या हातात तलवारी असल्याने विनोद यांनी त्यांना हटकले. हे तिघे रात्रीच्या वेळी रस्त्यावर येणा जाणाऱ्यांना लुटण्याच्या प्रयत्नात होते. विनोद यांनी हटकल्यानंतर यातील दोन आरोपींना पळ काढला. यातील सराईत आरोपी हसमत अली मुश्ताक शेख उर्फ मोहम्मद या एकोणीस वर्षीयाला पकडण्यासाठी विनोद हे पुढे गेले असता. त्याने हातातील बिअरची बाटली विनोद यांच्या दिशेने भिरकावली. ती बाटली विनोद यांच्या डोक्यात फुटली. या दुर्घटनेत थोडक्यात विनोद यांचा डोळा वाचला. मात्र रक्तबंबाळ अवस्थेतही विनोद यांनी अलीचा पाठलाग करून स्थानिकांच्या मदतीने त्याला पकडले. तोपर्यंत देवनार पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

हसमत अली मुश्ताक शेख हा त्या परिसरातील सराईत आरोपी असून त्याच्यावर या पूर्वीही मारहाण, धमकी आणि जिवे मारण्याचा प्रयत्न अशा दोन गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. याचे पळून गेलेले इतर दोन साथीदार लखन आणि फरहान उर्फ फोडी यांचा पोलिस शोध घेत आहेत. हसमतकडून पोलिसांनी 30 इंच लांबीची तलवार जप्त केली आहे. या प्रकरणी देवनार पोलिस अधिक तपास करत आहेत. 

bottle of beer smashed into a policeman head after he stabbed a man with a sword

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT