मुंबई

चीनी उत्पादकांवरील बहिष्कार तीव्र! विक्रेत्यांनीच घेतला पुढाकार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः कोरोना आक्रमणातून सावरण्यासाठी व्होकल फॉर लोकलची मागणी जोर धरल्यामुळे चीनी वस्तूंवरील बहिष्काराची मागणी केली जात होती. त्यातच आता भारत आणि चीन यांच्यातील संघर्ष जास्त तीव्र झाल्यामुळे चीनी वस्तूंवरील बहिष्काराची मागणी जोर धरत आहेत. त्यातच आता कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने चीनी वस्तूंच्या बहिष्काराची मागणी केली आहे. 

ट्रेडर्स कन्फेडरेशनने भारतीय वस्तूंना प्राधान्य देण्यासाठी थेट चीनमधून येणाऱ्या वस्तूंची यादीच जाहीर केली आहे. भारत चीनमधून होणारी भारताची आयात 13 अब्ज डॉलरने कमी करण्याचे लक्ष्य बाळगले आहे. त्यासाठी भारतीय बनावटीच्या वस्तूंना प्राधान्य देण्यास सांगितले आहे. महासंघाने जाहीर केलेल्या यादीत खेळणी, फर्निशिंग फॅब्रिक, टेक्स्टाईल, बिल्डींग हार्डवेअर, फूटवेअर, गार्मेंट, स्वयंपाकघरातील वस्तू, बॅग, हँड बॅग, कॉस्मेटिक, भेटवस्तू, जेम, इमिटेशन ज्वेलरी, स्टेशनरी, इलेक्ट्रीक वस्तू यासारख्या अनेक वस्तूंचा समावेश केला आहे. 

भारताची चीनमधून होणारी एकूण आयात 70 अब्ज डॉलर आहे. आता ही कमी करण्यासाठी भारतातही तयार होणाऱ्या तीन हजार वस्तूंची यादी तयार केली आहे. त्यांच्या निर्मितीसाठी तंत्रज्ञानाची मदत लागत नाही. त्याद्वारे भारत चीनमधील आयात कमी करु शकतो, असे महासंघाचे मत आहे. आता काही कंपन्या परदेशी असल्या तरी त्यांचे उत्पादन भारतात होत आहे. त्या कंपन्यांना बहिष्कारातून वगळण्याची सूचना करण्यात आली आहे. त्याचबरोबर चीनमधील तंत्रज्ञानाची मदत घेऊन केल्या जाणाऱ्या वस्तूंवरील बहिष्कारही अशक्य असल्याचे मानले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT