मुंबई

स्तनाचा कर्करोग आता तीन महिन्यांत बरा; टाटा रुग्णालयाच्या संशोधनाला यश; वाचा सविस्तर

भाग्यश्री भुवड



मुंबई  : मुंबईतील परळ येथील टाटा रुग्णालयाने केलेल्या संशोधनानूसार, आता केवळ  3 महिन्यांच्या औषधोपचारांनीच स्तनाचा कर्करोग बरा होऊ शकणार आहे. शिवाय यामुळे औषधोपचारांना लागणारा खर्चही कमी होणार आहे. रुग्णालयाने 11 हजार रुग्णांवर केलेल्या चाचणीतून हा निष्कर्ष काढला आहे. टाटा मेमोरियल रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे, एसीटीआरईसीचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता आणि टाटा रुग्णालयातील डाॅक्टर गेल्या 15 वर्षांपासून यावर संशोधन करत होते. 

ट्रॅस्टुझुमॅब हे औषध स्तन कर्करोगावर प्रभावी मानले जाते. मात्र, यात दोन त्रुटी होत्या. एक तर हे औषध महागडे होते. तसेच, हे औषध वर्षभरासाठी घ्यावे लागत होते. मात्र, टाटा रुग्णायातील डाॅक्टरांनी विकसित केलेल्या नव्या उपचार पद्धतीमुळे हे औषध आता केवळ तीन महिने घ्यावे लागणार आहे, असे रुग्णालयाचे संचालक डाॅ. राजेंद्र बडवे यांनी सांगितले. 

या औषधाच्या मूळ ब्रँडची किंमत 8 ते 10 लाख रुपये असुन ते सर्वसामान्यांना न परवडणारे आहे. शिवाय वर्षभर औषध घेतल्याने हृदयावरही त्याचे विपरित परिणाम होते.  या कारणांमुळे गेल्या पंधरा वर्षांपासून उपचाराचा कालावधी कमी करण्यावर संशोधन सुरु होते. अखेर टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या डॉ. सुदीप गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या संशोधनाला यश आल्याचे डाॅ. बडवे म्हणाले.  भारतीय महिलांमध्ये ' एचइआर 2' या प्रकारातील स्तनाचा कर्करोग सर्रास आढळून येतो. अशा महिलांंना या दोन्ही गोष्टींमुळे मोठा दिलासा मिळणार असल्याचेही ते म्हणाले.

सामान्यांना मोठा फायदा
नवी उपचार पद्धती तीन महिन्यांचीच असल्याने स्तन कर्करोगावरील ट्रॅस्टुझुमॅब  हे औषध सर्वसामान्यांना खरेदी करता येऊ शकेल. त्याचा मोठा फायदा त्यांना होईल. या अभ्यासातून हृदयावरही जास्त विपरीत परिणाम झाल्याचे आढळले नाही, असे एसीटीआरईसीचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता यांनी सांगितले आहे.

आम्ही स्तनाच्या कर्करोगाबाबत अभ्यास करत होतो. त्याची उपचार पद्धती कशी कमी करता येईल यावर संशोधन सुरु होते. मात्र, आता नव्याने समोर आलेल्या उपचार पद्धतीमुळे एका वर्षांचा कालावधी थेट 3 महिन्यांवर आला आहे. एचइआर 2 हा स्तनाचा कर्करोग देशातील 25 टक्के लोकांमध्ये आढळतो. 


- डॉ. राजेंद्र बडवे,
संचालक, टाटा मेमोरियल रुग्णालय

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT