रागाचा अंत! राजकीय वैमनस्यातून सख्या भावानेच काढला भावाचा काटा... 
मुंबई

रागाचा अंत! राजकीय वैमनस्यातून सख्या भावानेच काढला भावाचा काटा...

सकाळ वृत्तसेवा

पोलादपूर : पोलादपूर तालुक्यातील माटवण येथे राजकीय पूर्ववैमनस्यातून वादंग निर्माण झाला. या वादातून भावाने सख्या भावाची धारदार शस्त्राने हत्या केली असल्याची घटना रविवारी (ता.1) घडली.यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. सखाराम विश्राम मांढरे असे आरोपीचे नाव आहे.

या बाबत आरोपीचा पुतण्या अतुल गणपत मांढरे यांनी पोलादपूर पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत 7 जणांना अटक केली असून 40 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माटवण येथील गणपत विश्राम मांढरे व सखाराम विश्राम मांढरे हे सख्खे भाऊ असून पूर्वीपासून यांच्यात व गावात शेकाप, शिवसेना असा वाद आहे. पूर्व वैमनस्यातून रविवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास गैर कायद्याची मंडळी जमवुन आरोपीने धारदार हत्याराने त्यांचा खून केला. या घटनेमुळे पोलादपूर तालुक्यात खळबळ उडाली.  या घटनेनंतर पोलादपूर पोलिसांनी आरोपी सखाराम मांढरे व विठ्ठल मस्के यांच्यासह 38 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून 7 जणांना ताब्यात घेतले.

गावात राजकिय तणाव
माटवण गावात राजकीय तणाव निर्माण झाल्याने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या घटनेनंतर आमदार भरत गोगावले, युवा नेते विकास गोगावले, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे, मानगाव येथील पोलिस अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव हे करीत आहेत .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon: माॅन्सूनची अजून पाच दिवसांची प्रतीक्षा! राज्यात ७२ टक्के कमी पावसाची नोंद, जूनच्या पहिल्या पंधरवड्यात बहुतेक जिल्ह्यांमध्ये अत्यल्प पाऊस

आजचे राशिभविष्य - 16 जून 2026

Moong Dal Palak Idli Recipe: प्रोटीन आणि आयर्नचा भरपूर खजिना; नाश्त्यासाठी बनवा मऊ अन् स्पंजी 'मूग डाळ-पालक इडली'

16 जून 2026 पंचांग! चंद्रदर्शन, त्रिपुष्कर योग आणि शुभ मुहूर्तांची माहिती

अस्थिबोध : गरम पाण्याची पिशवी की बर्फ?

SCROLL FOR NEXT